
Mumbai : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेल्या काळा घोडा परिसरातील पाच रस्ते हे दर शनिवारी व रविवारी सायंकाळी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान वाहनांसाठी बंद राहतील. तसेच या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर हा ऐतिहासिक आणि पुरातन खाणाखुणा जपणारा परिसर आहे. नागरिक, पर्यटक आदींची या भागात नेहमीच वर्दळ असते. पर्यटकांना ‘हेरिटेज वॉक’चा आनंद घेता यावा, येथील पुरातन वास्तू न्याहाळता याव्यात या उद्देशाने काळा घोडा परिसरातील साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, व्ही. बी. गांधी मार्ग/फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी भरुचा मार्ग हे पाच रस्ते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान वाहनांसाठी बंद करुन केवळ पादचाऱ्यांसाठी सुरु ठेवण्याचा आणि या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
|
Mumbai : सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याचे टास्कच्या नादात खाते रिकामे, तीन दिवसांत गमावले ११ लाख |
काळा घोडा हा मुंबईचा कला परिसर आहे.त्यात छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी आर्ट आणि इलियाहू सिनेगॉग आहे. या परिसरातील पर्यटन वाढवण्यासाठी ही योजना आहे. विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाब्यातील अनेक सुशोभीकरण योजनांपैकी ही एक योजना आहे.
काळा घोडा परिसरातील पादचारी मार्गांची, सुशोभीकरण कामांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि सह पोलीस आयुक्त (वाहतूक)अनिल कुंभारे यांनी नुकतीच पाहणी केली. काळा घोडा परिसरातील पादचारी मार्ग तसेच सुशोभीकरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला. सहायक आयुक्त (ए विभाग) जयदीप मोरे, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या दरम्यान त्यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी, पर्यटक, कर्मचारी आदींशी संवाद साधला. तसेच हा परिसर अधिकाधिक सुंदर करण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया, सूचना आदी जाणून घेतल्या. केवळ पादचारी मार्ग ही शहरासाठी एक नवीन संकल्पना आहे आणि या योजनेत सुधारणा करण्यासाठी अभिप्राय विचारात घेतले जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विशेष गरजा असलेल्या नागरिकांसाठी, आरएफआयडी आधारित वाहन प्रवेश असेल. प्रतिबंधित क्षेत्रात त्याची वेगमर्यादा ताशी २० किमी पेक्षा जास्त नसेल, अशी माहिती माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिली.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




