
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. २७ ऑगस्टला ते आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेला रवाना होणार आहे. मुंबईकडे निघणाऱ्या या मोर्चामध्ये मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईकडे मोर्चा घेऊन येऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
मनोज जरांगेंशी वाटाघाटी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. याआधी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी मनोज जरांगे यांच्याकडे मार्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे हे मोर्चावर ठाम असून उद्या ठरल्याप्रमाणे मोर्चा निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी नुकताच मनोज जरांगे यांची भेट घेतली. मोर्चाची तारीख पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली. पण मनोज जरांगे पाटील यांनी माझी त्यांच्यासोबत काहीच चर्चा झाली नाही असे सांगितले. मनोज जरांगे यांनी सरकारला स्पष्ट सांगितले की, 'आम्हाला कोणताही एक रस्ता द्या. हजार रस्ते आहेत त्यापैकी एक रस्ता द्या. मी मोर्चावर ठाम आहे. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. ३ महिन्यांचा वेळ द्या म्हणाले. आता उद्या सकाळी १० वाजता मराठा समाजाचा मोर्चा शांततेत निघणार आहे.'
मनोज जरांगे यांनी सांगितले की, '४ महिन्यापूर्वी मी या तारखेची घोषणा केली होती. फडणवीसांना आम्ही दोन महिन्यापूर्वी सांगितले होते की मुंबईला आम्हाला यायचे नाही. २६ ऑगस्टच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावनी करा हे आम्ही आधीच सांगितले आहे. उपाध्याय यांना माहिती नसेल की आम्ही सुद्धा गणेशभक्त आहोत. आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. आता फडणवीसांच्या जिव्हारी यायला लागले आहे. कारण मराठ्यांनी वेळ दिला. कायदेशीररित्या मराठे बसतात या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या आहेत. आता काय करायचे तर मग आता रडगाणं करायचे, अंगावर आले तर ढकलून द्यायचे. कारण मी मॅनेज होत नाही. मी फुटत नाही त्यामुळे ही कारणं आहेत.'
मोर्चा मुंबईत आल्यानंतर मोठी समस्या होईल यावर जरांगे म्हणाले की, 'काहीही वाहतूक कोंडी होणार नाही. हे मुद्दाम नाही. ४ महिने झाले तारीख जाहीर केलेली. आम्ही शांततेत येणार आहोत. गरिबाची लेकरं आहोत आणि आम्ही सुद्धा गणेशभक्त आहोत. आमची लोक मुंबईकडे निघाले पण. मराठे धडाधड निघालेत. उद्या सकाळी १० वाजता मी मुंबईला निघणार आहे. आता चर्चा नाही. चर्चा तिथे गेल्यावर. आजचा दिवस फक्त अंमलबजावनीसाठी. चर्चा खूप झाल्या आहेत. आता चर्चा झाली तर थेट मुंबईत आझाद मैदानावर.'
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




