
Pune : दक्षिण पुण्यातील कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील रहिवाशांना लवकरच मेट्रो मिळणार असल्यची शक्यता आहे. शिवाजीनगरपासून ते येवलेवाडीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याच्या सध्या प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सर्व मंजुऱ्या आणि सर्वेक्षण वेळेत पूर्ण झालं तर 2030-31पर्यंत ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर ते येवलेवाडी अशी 20 किमी लांब उन्नत मार्गिका उभारण्याचं काम हाती घेतले असल्याची माहिती दिली.
कुठून-कसा असेल मार्ग?
हिंजवडी ते शिवजीनगर 23 किमी लांब मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा हा एक भाग आहे. हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारली जात आहे. परंतु, कोंढवा ते येवलेनगर मेट्रोचं काम थेट महामेट्रोकडून करण्यात येणार आहे. या मार्गावर एक अतिरिक्त स्परद्वारे एनबीएम ते उंड्री विस्तारही होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला कॅम्प आणि पुलगेट मार्गे जोडण्याचा प्रस्ताव आहे.
महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्र सर्वेक्षणाचाही सध्या अभ्यास सुरू आहे. प्रस्तावित मार्ग शिवाजीनगर पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोडून नंतर कॅम्प आणि पुलगेट मार्गे कोंढावा आणि येवलेवाडीकडे वाढवण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावित स्पर लाइन ज्योती चौक ते एनआयबीएम जंक्शन आणि पुढे बिशप विद्यालयाजवळ उंड्रीपर्यंत नियोजित केला आहे. शिवाय या मार्गावर 1 किमी अंतरावर मेट्रो स्थानक उभारण्याचं सध्या नियोजन आहे.
कधी काम सुरू होणार?
या मार्गिकेसाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी सल्लागारांची नियुक्ती केली गेली होती. मे-जूनपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर होणे अपेक्षित असून सर्वेक्षण करून तो पुढील वर्षापर्यंत राज्याच्या मान्यते नंतर केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार योगेश टिळेकर यांनी कोंढला-येवलेवाडी मेट्रो मार्गाची मागणी केली होती. हडपसरपर्यंत मेट्रो मंजूर झाली असली तरी कोंढवा परिसरात मेट्रो नसल्याने नागरिकांना प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारने पुण्यातील पूर्व आणि पश्चिम भागांमधील कनेकटीव्हीटी मजबूत करण्यासाठी एका नव्या मेट्रो मार्गिकेला मंजुरी दिली होती. खडकवासला, हडपसर, स्वारगेट आणि खराडी असा हा मार्ग ठरवण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!




























Subscribe to my channel




Refer friends, earn cash—sign up now!