
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या नाट्यमयी घडामोडींनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज अनेक चर्चा पाहायला मिळतात. शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर आता उद्धव ठाकरेआणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा वारंवार कानावर येत होत्या. पण सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे युती करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आता याबाबात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत राज ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील, तसेच ते मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. अशातच आताचे मुख्यमंत्री भेटतात, आधीचे मुख्यमंत्री भेटत नव्हते, असं म्हणत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "मुळात विषय असा आहे की, आताचे मुख्यमंत्री येऊन भेटतात तरी, आधीचे जे मुख्यमंत्री होते, ते भेटायचेच नाही कोणाला. जे काही महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते सन्मानिय राज ठाकरे घेऊन जातात मुख्यमंत्र्यांकडे. त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो. शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सर्वजण राजकारणात आहोत, त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी भेट होत असेल, तर त्यात वावगं नाही.
|
|
राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील : संदीप देशपांडे
"राज कारणात कधी काय होईल? हे काही आज सांगता येणार नाही. 2024 च्या पोटात काय दडलंय? हे कोणाला माहीत. पण यासंदर्भातील जो काही निर्णय असेल, तो राज ठाकरे योग्य वेळी घेतील. तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल.", असं संदीप देशपांडे म्हणाले.
बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेंकडेच : संदीप देशपांडे
संदीप देशपांडे म्हणाले की, "राज ठाकरेंकडे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे, वास्तूचा वारसा असेल काही लोकांकडे, पण विचारांचा वारसा आहे, तो राज ठाकरेंकडेच आहे. बाळासाहेबांचे विचार, त्यांची महाराष्ट्राबाबतची स्वप्न, त्यांची हिंदुत्वाबाबतची कास कोणाकडे असेल तर ती राज ठाकरेंकडेच. त्यांचे विचारही सर्व जनतेला आपलेसे वाटतात. कोणतंही राजकारण करताना मराठी माणसाला किंवा हिंदुत्वाला यश मिळालं पाहिजे, हे धोरण असलं पाहिजे."
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!




























Subscribe to my channel




