
Chandrashekhar Bawankule on opposition allegations over EVM Hack : सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करून, ईव्हीएम हॅक करून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा विरोधी पक्षांनी आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील तशी तयारी करण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत. शिवसेनेने (ठाकरे) देखील यावर विचार सुरू केला आहे. ईव्हीएमविरोधात मोठं आंदोलन उभारण्याच्या हालचाली शिवसेनेत (ठाकरे) चालू आहेत.
दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या या आरोपांवर भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक तुम्ही (काँग्रेस) जिंकलात, तिथे ईव्हीएम चांगले होते का? लोकसभेतही तुम्ही मोठं यश मिळवलं तेव्हा ईव्हीएम चांगले होते का?
चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना म्हणाले, “नांदेडची पोटनिवडणूक तुम्ही जिंकलात, आम्ही तिथे हरलो. जर ईव्हीएम हॅक करून मतं घेता आली असती तर आम्ही नांदेड लोकसभेतही तशी मतं घेतली नसती का? खरंतर हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावं. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केलं होतं.
|
|
त्या पराभवातून आम्ही शिकलो. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जे अपयश आलं, त्यानंतर आम्ही काही नव्या गोष्टी शिकलो. त्या पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केलं. पुढे काय करायचं ते ठरलं. रणनीती ठरली. आम्ही प्रत्येक बूथवर जाऊन काम केलं. मतदान केंद्रांवर जाऊन जनतेला भेटलो. त्यानंतर मतदानाचं प्रमाण देखील वाढलं.
विरोधकांना झोप लागलेली नाही : बावनकुळे
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केलं. मतदान केंद्रांवर मतदानाचे प्रमाण वाढलेलं दिसलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडला. परंतु, विरोधक जे काही बोलत आहेत तो त्यांचा खोटारडेपणा आहे. मला असं वाटतं दोन-चार दिवस त्यांना झोप लागणार नाही. जेव्हा त्यांची झोप लागेल, त्यानंतर त्यांचे डोक शांत राहील.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




