
Lalit Patil Drug Case : राज्यात पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील ड्रग प्रकरण गाजत असतानाच नाशिकच्या ड्रग्स प्रकरणाचे सोलापूर नेक्शन उघडकीस आलं आहे. मुंबई पुणे पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन कारवाई करत असताना नाशिक पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत मुंबई आणि सोलापूरमध्ये धडाकेबाज कारवाई केली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा ललित पाटील प्रकरणाशी अद्याप कुठलाही संबंध नाही. नाशिक रोड परिसरातील ड्रग्सच्या गुन्ह्याचा माग काढताना नाशिक पोलिसांनी सोलापुरातील ड्रग्सचा कारखाना उध्वस्त केला असून सुमारे 10 कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त केलाय, नाशिकमध्ये सोलापूरमधून ड्रग्ज येत असल्याचं तपासात उघडकीस आलंय. तर नाशिकच्या वडाळा गावातील ड्रग्ज रॅकेटचा तपास करताना मुंब्र्यातून दुसऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. शब्बीर असे या संशयिताचं नाव आहे.
चार दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी सलमान नावाच्या ड्रग्स पेडलरला अटक केली होती. सलमान नाशिकपर्यंत ड्रग्स सप्लाय करायचा त्याला शब्बीर ड्रग्स पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली. मुबंईतील रॅकेटची साखळी शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक आणि क्राईम ब्रँचच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.
|
|
ड्रग्ज प्रकरणात नाशकात तीन वेगवेगळे गुन्हे
आतापर्यंत नाशकात ड्रग्ज प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वात पहिला गुन्हा ललित पाटील ड्रग प्रकरणात दाखल करण्यात आला होता. यासंबंधित गोडाऊन नाशिक पोलिसांनी उध्वस्थ केले होते. याचा तपास स्वतंत्रपणे नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणातील गुन्हेगार मुंबई आणि पुण्यातील आरोपींशी संबंधित आहेत. पण काल (शुक्रवारी) पोलिसांनी जी कारवाई केली आहे, ती एका ड्रग रॅकेटसंदर्भातील आहे. नाशिकमध्ये ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी आरोपींनी सोलापुरात कारखाना सुरू केला होता. गेल्या 10 ते 12 दिवसांपूर्वी सोलापुरात आणखी एक कारखाना उध्वस्त केला होता. ते प्रकरण आणि कालचं प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे. पोलिसांनी कारवाई केलेल्या कारखान्यात प्रयोगशाळा तयार करण्यात आली होती. त्यासोबतच ड्रग्जचा साठा, कच्चा मालही सापडला आहे.
नाशिकच्या वडाळागाव परिसरात छोटी भाभीचं ड्रग रॅकेट होतं. तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी आधीच अटक केली होती. आतापर्यंत चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नाशिक पोलिसांनी सलमान नावाच्या ड्रग्स पेडलरला अटक केली होती. सलमान नाशिकपर्यंत ड्रग्स सप्लाय करायचा त्याला शब्बीर ड्रग्स पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, नाशिक पोलिसांची ड्रग्स प्रकरणातील कारवाई सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



