
Mumbai : बहुप्रतीक्षित मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला नुकतीच सुरुवात झाली असून या मार्गावरील आता इतर दोन थांब्यांसाठी सागरी महामंडळाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. त्यानुसार जयगड आणि वेंगुर्ला या जेट्टीचे काम येत्या महिनाभरात पूर्ण केले जाणार असून हे दोनही थांबे त्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली. मुंबई ते विजयदुर्ग या रोरो सेवेबरोबरच नेरूळ ते मुंबई जलवाहतूक सेवाही सागरी महामंडळामार्फत लवकरच सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मार्गावरील दोन थांबे सुरू करण्याची मागणी
महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला नुकताच हिरवा कंदील दर्शविण्यात आला होता. मंत्री नितेश राणे यांनी या रोरो सेवेचा शुभारंभ केल्यानंतर आता विजयदुर्गसोबत या मार्गावरील इतरही दोन थांबे त्वरीत सुरू करण्याची मागणी कोकणवासीयांकडून करण्यात येत आहे. त्याबरोबरच या रोरो सेवेतील तिकीट दर अधिक असून ते कमी करण्याची मागणीही प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे. जयगड येथे औद्योगिक व बंदरविकासाच्या दृष्टीने हा थांबा महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रवाशांच्ये वेळेची बचत होणार
वेंगुर्ला थांब्यांमुळे मालवण, तारकर्ली, आचरा परिसरातील पर्यटनस्थळांना सुलभ संपर्क मिळणार आहे. वाहनांसह प्रवासाची सोय उपलब्ध असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. या जेट्टींवरील तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असून सुरक्षा व परवानगी प्रक्रियेनंतर नियमित वेळापत्रक जाहीर केले जाईल. नव्या थांब्यांमुळे मुंबई–कोकण जलवाहतूक सेवेचे जाळे अधिक मजबूत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘कोकण किनारपट्टीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या जलवाहतुकीच्या नव्या पर्यायामुळे कोकणातील पर्यटनाला अधिक चालना देण्याचा उद्देश असून या वाहतूक सेवेमुळे चाकरमन्यांच्या वेळेतही बचत होणार आहे. नव्या जेट्टी कार्यान्वित झाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी भागांना थेट जलमार्गे जोडणी मिळणार आहे. त्यामुळे पर्यटन, मत्स्यव्यवसाय तसेच स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळेल’, अशी पेक्षा राणे यांनी यावेळी व्यक्त केली.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




