
Hinjewadi IT Park Traffic Jam : समस्येच्या सोडवणुकीच्या जबाबदारीबाबत सरकारी यंत्रणांनी एकमेकांकडे बोटे दाखवली, की समस्या कशी ‘जैसे थे’ राहते, याचा अनुभव सध्या हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे कर्मचारी घेत आहेत. आयटी पार्कमधील वाहतुकीची समस्या सोडविण्याची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी), आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीची, की पिंपरी-चिंचवड महापालिकेची हेच आता कळेनासे झाल्याचे चित्र आहे.
हिंजवडीतील आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दररोज हाल सुरू आहेत. या प्रकरणी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनसह अनेक संघटना सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. प्रत्यक्षात ठोस उपाययोजना न झाल्याने पावसाळ्यात आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या आणखी वाढली. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले असून, पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचणे, खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण होणे असे चित्र दिसत आहे.
|
Pune : मुख्यमंत्रिपदाच्या ‘बिहार पॅटर्न’ची अफवा; अजित पवार यांचे स्पष्टीकरण |
या प्रकरणी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने ‘पीएमआरडीए’ आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसमवेत आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची नुकतीच पाहणी केली. सुरुवातीला यात ‘एमआयडीसी’कडे बोट दाखविण्यात येत होते. मात्र, पाहणीत ‘पीएमआरडीए’शी निगडित अनेक गोष्टी कोंडीसाठी कारणीभूत असल्याची बाब समोर आली. यानंतर ‘पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम करणाऱ्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीला नोटीस बजावली. प्रत्यक्षात या मेट्रोचे काम ‘पीएमआरडीए’च्या देखरेखीखाली सुरू असताना अशी नोटीस बजावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रत्येक यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने कोंडी वाढत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने शोधलेली कोंडीची कारणे
मेट्रोच्या कामाचा राडारोडा रस्त्यांच्या कडेच्या असलेल्या नाल्यात टाकून ते बुजविण्यात आले.रस्त्याच्या कडेला राडारोड्याचे ढीग टाकण्यात आल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी साचत आहे.पीएमआरडीएने रस्त्याच्या कडेला बांधकाम परवानग्या दिल्या. परंतु, बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यापेक्षा उंचीवर बांधकाम केल्याने पाणी साचत आहे.बांधकाम परवानग्या दिल्यानंतर त्यांच्यावर ‘पीएमआरडीए’ने योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवले नाही.ग्रामपंचायतींच्या हद्दीत सांडपाणी व्यवस्था नाही.अनेक ठिकाणी बांधकामांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात आहेत. मेट्रोच्या कामासाठी काही रस्ते ताब्यात घेण्यात आले आहेत. मेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीची आहे. हे रस्ते सुस्थितीत आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याचे कामही त्यांचेच आहे.हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम ‘पीएमआरडीए’च्या देखरेखीखाली सुरू असले, तरी रस्त्यांची खराब अवस्था झाल्याने कंत्राटदार कंपनीला नोटीस बजवावी लागली. रस्ते व्यवस्थित ठेवण्याचे काम कंत्राटदार कंपनीचे आहे. त्यांच्याकडून आता रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.सध्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडकडून रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यांवर पाऊस पडल्यास पाणी वाहून जाण्यास मार्ग नाही. त्यामुळे तिथे पुन्हा पाणी साचून हे रस्ते खराब होणार आहेत. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था प्राधान्याने करायला हवी होती. मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून केवळ वरवरची मलमपट्टी केली जात आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


