
Maharashtra bike taxi rules explained : लाखो मुंबईकरांचा प्रवास आता स्वस्त अन् मस्त होणार आहे. मुंबईमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. त्यासाठी भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. १.५ किमीसाठी किमान भाडं 15 रुपये आकारलं जाणार असून, त्यापुढे प्रत्येक किलोमीटरला 10.27 रुपये प्रमाणे दर लागू होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली आहे. How to book e-bike taxi in Mumbai
महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने सोमवारी मुंबई आणि उपनगरात बाईक टॅक्सी सेवांसाठी ओला, उबर आणि रॅपिडो यांना तात्पुरते परवाने दिलेत. अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर या कंपन्यांनी एका महिन्याच्या आत कायमस्वरूपी परवान्यांसाठी अर्ज करावा. या अटीवर ही मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक राईडसाठी १.५ किमीसाठी किमान भाडे ₹ १५ इतके निश्चित केले आहे. म्हणजे. एका किमीसाठी १० रूपये इतके भाडे असेल.
मागील दोन महिन्यांत मुंबईमध्ये बाईक टॅक्सी चालविण्यासाठी वाहतूक विभागाला ४ अर्ज मिळाले होते. त्यापैकी ओला, उबर आणि रॅपिडो यांना मान्यता मिळाली आहे. तर चौथ्या कंपनीला फटका बसला आहे. स्मार्ट-राईडला बाईक टॅक्सी चालविण्यासाठी आवश्यक अटी आणि शर्ती पूर्ण करण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना प्राधिकरणाने डावलले. नवीन महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ राज्य सरकारने सरकारी ठराव (GR) द्वारे लागू केले.
ई-बाईकसाठी प्रति १.५ किमीसाठी १५ रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर उर्वरित प्रवासासाठी प्रवाशांकडून प्रति किमी १०.२७ रुपये आकारले जातील. राज्य परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखालील एसटीएने १८ ऑगस्ट रोजी हा निर्णय घेतला होता.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्राधिकरण एक वर्षानंतर बाईक टॅक्सीच्या भाड्यांचा आढावा घेण्याचा विचार करत आहे. हे नवीन बाईक टॅक्सीचे भाडे हे काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या किमान भाड्यापेक्षा खूपच कमी आहे. मुंबईत प्रवाशांना काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी किमान ₹ 31 आणि ऑटोरिक्षांसाठी ₹ 26 भाडे द्यावे लागते.
बाईक टॅक्सीचा महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. एक लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये बाईक टॅक्सीसाठी राज्य सरकारने धोऱण जाहीर केले होते. नव्या धोरणांनुसार, एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरात बाईक टॅक्सी सुरू होणार आहे. कमी भाड्यामध्ये प्रवास करता येणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो लोकांना होणार आहे
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




