साताऱ्यात गेल्या काही काळापासून देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) या सायबर गुन्ह्याचे धागेदोरे आता चक्क साताऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. सातारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई करत कोरेगावमधील एका आंतरराष्ट्रीयसायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. एका बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी १७ संशयितांना ताब्यात घेतले असून ५ मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे.
हे आरोपी साताऱ्यात बसून थेट अमेरिकेतील नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून लाखो डॉलर्स उकळत होते. छोट्या शहराची निवड आणि संशयास्पद हालचालीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये 'श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टन्स एलएलपी' या नावाने हे बेकायदा कॉल सेंटर फेब्रुवारी २०२६ पासून चालवले जात होते. एका छोट्या शहरात किंवा गावात असे कॉल सेंटर चालवले तर कोणालाही संशय येणार नाही, या उद्देशाने आरोपींनी कोरेगावची निवड केली होती. हे कॉल सेंटर पूर्णपणे अमेरिकन वेळेनुसार म्हणजेच रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत चालत असे.अशी होती फसवणुकीची पद्धत (Modus Operandi)या कॉल सेंटरमधील तरुण-तरुणींना अमेरिकन लहेजाचे (American Accent) प्रशिक्षण देण्यात आले होते. ते व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) चा वापर करून अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधायचे.
आरोपी आधी त्यांना "तुमच्या नावाने ई-कॉमर्स साईटवरून संशयास्पद खरेदी झाली आहे" किंवा "तुमचा अंमली पदार्थ (Drugs) तस्करीशी संबंध आहे" अशी भीती दाखवायचे. त्यानंतर अमेरिकेचे कायदा अंमलबजावणी अधिकारी बोलत असल्याचे भासवून त्यांना 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी दिली जायची.कारवाई टाळण्यासाठी किंवा केस बंद करण्यासाठी त्यांच्याकडून ऑनलाइन गिफ्ट कार्ड, व्हाऊचर किंवा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून डॉलर स्वरूपात पैसे उकळले जात होते. पोलिसांची धाड आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या अपार्टमेंटवर अचानक छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहताच आरोपींनी कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमधील डेटा डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवून आरोपींना ताब्यात घेतले. या छाप्यात १७ तरुण आणि ४ तरुणी संशयित म्हणून आढळून आल्या.लाखोंची रोकड आणि मुद्देमाल जप्तया धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ३५ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम, अनेक हायटेक लॅपटॉप, महागडे मोबाईल आणि अमेरिकन नागरिकांचा मोठा डेटा जप्त केला आहे. या कॉल सेंटरमधून दरमहा २० लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमेरिकन नागरिकांचे मोबाईल नंबर या टोळीकडे कसे पोहोचायचे आणि डॉलरचे भारतीय रुपयात रूपांतर करण्यासाठी कोणत्या हवाला मार्गांचा वापर केला गेला, याचा सखोल तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल करत आहे.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



