छत्रपती संभाजीनगर: 'तुम्ही वेलकम हॉटेलला या'; विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीला बोलावून हॉटेलच्या रुममध्ये संपवले, खळबळजनक घटना!

छत्रपती संभाजीनगर: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढ E चालले आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडली आहे. पडेगाव येथे राहणाऱ्या पत्नीने पतीला भेटण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि त्यानंतर तिथे त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शबानाने पती जाबीरला भेटण्याच्या आणि चर्चेच्या उद्देशाने रांजणगाव पोळ शिवारातील 'वेलकम हॉटेल'मध्ये बोलावून घेतले होते. जाबीर सोमवारी २० जुलै रोजी सकाळी आपल्या घरातून निघाला होता. शबाना भेटल्यानंतर दोघेही हॉटेलच्या रुममध्ये गेले. काही वेळातच तिथे शबानाचा मामा कलीम मेहमूद पठाण (रा. सोनेसांगवी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) हा देखील पोहोचला. या दोघांनी मिळून हॉटेलच्या खोलीत जाबीरवर हल्ला केला.

 

या भयानक हल्ल्यात जाबीरचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. वैवाहिक कलहातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *