
Ahmednagar News : अहमदनगरआणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर आता नगर जिल्ह्यातून त्याला होणारा विरोध वाढताना दिसत आहे. रस्त्यावरच्या लढाई बरोबरच आता न्यायालयीन लढाईसुद्धा सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यातील प्रवरा कारखाना, संजीवनी कारखाना आणि शंकरराव काळे कारखाना या तिघांनी न्यायालयात याचिका दाखल करत जायकवाडीला पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
2005 च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचा विचार करून नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा कायदा संमत झाला होता. मात्र आता या कायद्यालाच विरोध होत असून या कायद्याचं फेरविचार व्हावा अशी मागणी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून होताना दिसते. यावर्षी पावसाळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. अनेक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत जायकवाडीला पाणी देऊ नये असाच सूर आता सर्वपक्षीय नेत्यांमधून पुढे येताना दिसतो. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन करत जायकवाडीला पाणी देण्यास विरोध केला आहे.
|
|
दरम्यान, काळे कारखान्याने केलेल्या याचिकेवर 20 नोव्हेंबरपर्यंत गोदावरी पाटबंधारे महामंडळाला म्हणण मांडण्याचे आदेश दिले आहेत. यावर 5 डिसेंबरला सुनावणी होईल. तर विखे यांच्या प्रवरा कारखान्याने केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होईल. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी रास्ता रोको आंदोलन केलं तर कोपरगावमध्ये भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी लाक्षणिक उपोषण करत जायकवाडीला पाणी देण्यास विरोध केला. या पाठोपाठ आता शिंदे गटाचे शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सुद्धा जायकवाडीला पाणी देण्याचा विरोध करत नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यावेळच्या मंत्रिमंडळात असलेले थोरात आणि विखे हे दोन्ही नेते अहमदनगर जिल्ह्यातील... मात्र आता सर्वच पक्ष नेत्यांनी जायकवाडीला पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे..
जायकवाडीविरुद्ध नेत्यांची एकजूट
तसेच संजीवनी साखर कारखान्याच्या वतीने आजच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून 21 डिसेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे. न्यायालयीन लढाई बरोबरच आम्ही रस्त्यावरची लढाई सुद्धा लढणार असल्याचे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केलं. तर जायकवाडीतून सर्वांनाच एकत्र पाणी मिळत असल्याने ते नेते एकत्र येतात. मात्र नगर आणि नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळी धरण असल्याने नेते वेगवेगळी भूमिका घेतात ही शोकांतिका आहे. मात्र आता सर्व नेत्यांनी एकत्र येण्याचं आवाहन विवेक कोल्हे यांनी केल आहे. 2005 ला सिंचन क्षमता तेवढी नसेल त्यामुळे त्यावेळी विरोध झाला नाही मात्र आता सिंचन क्षमता वाढली असल्याने राजकीय नेतृत्वाने समन्यायी पाणी वाटप कायद्याचा फेरविचार करावा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केली आहे. राज्य सरकारने नगर आणि नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जायकवाडीला पाणी देण्याच्या निर्णयाबाबत फेरविचार केला नाही तर आगामी काळात नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा हा प्रादेशिक पाण्याचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!
























Subscribe to my channel



