
Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून राज्यात प्रचंड गोंधळ सुरू आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. हे सरकार सर्व गोष्टींचं खासगीकरण करायला निघालं आहे, असा आरोप विरोधकांकडून केलं जात आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीवरून आज सर्वात मोठा दावा केला आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय हा काँग्रेस सरकारचाच होता. नंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरती करण्याचं धोरणच स्वीकारलं होतं. त्याबाबतचा जीआर काढण्यात आला होता. आम्ही हा जीआरच रद्द करत आहोत. त्यांचं धोरण हे आमच्या सरकारचं धोरण असूच शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीवर सविस्तर भाष्य केलं. ठाकरे, पवार गट आणि काँग्रेसकडून कंत्राटी भरतीबाबत आरोप केले जात होते. आमच्या सरकारवर आरोप केले जात होते. कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतला. शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना तीन जीआर निघाले. त्यात शिक्षकपदापासून विविध पदांवर कंत्राटावर लोकांना घ्यायची तरतूद करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचे तीन जीआर निघाले होते, असं देवेद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळ फडणवीस यांनी पुरावा म्हणून उद्धव ठाकरे सरकारने कंत्राटी भरतीबाबत काढलेला जीआरच पुरावा म्हणून दिला.
|
Lalit Patil : ललित पाटील याचा मित्र परिवार विधानसभेपर्यंत; संजय राऊत यांचा सर्वात गंभीर आरोप |
आम्ही रेट कमी केला
2014मध्ये फॅसिलिटी मॅनेजरला एम्पॅनल केलं गेलं. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना त्या सरकारने एक धोरण म्हणून त्याला स्वीकारलं. त्यानंतर फॅसिलिटी मॅनेजरचा टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. त्याची मान्यता उद्धव ठाकरे यांनी दिलीय. त्यावर त्यांची सही आहे. ही प्रक्रिया त्यांच्या काळात झाली. जेव्हा आमचं सरकार आलं. जेव्हा आमच्या कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव आला. तेव्हा मीच सांगितलं याचे रेट कमी करा. 25 ते 30 टक्के रेट जास्त आहेत, त्यामुळे हे रेट कमी केले पाहिजे, असं मी म्हटलं. त्यानंतर 25 ते 30 टक्के रेट कमी केला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
जीआर रद्द
मात्र या कंत्राटी भरतीचं टेंडर आम्हीच काढलं अशा पद्धतीने या तिन्ही पक्षांनी संभ्रम निर्माण केला. मी विधानसभेतही सांगितलं हे पाप त्यांचं आहे. आमचं नाही. आणि मी आमच्या मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मागच्या सरकारचं धोरण आम्ही धोरण म्हणून का स्वीकारावं?
हे त्यांचं धोरण होतं. त्यामुळे हा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच इतर विभागांना पदे भरण्याचा असलेला अधिकार कायम ठेवला आहे. पण धोरण म्हणून फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या संस्थाना एकत्रित काम देण्याचं काम करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. हे आमचं पाप नाही. हे आघाडी सरकारचं पाप आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




