पुणे: शिरूर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील शिवनगर परिसरामध्ये चारित्र्याच्या संशयावरून एका शेतमजूर पतीने आपल्या सख्ख्या पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून तिचा अत्यंत निर्घृण खून केल्याची थरारक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत महिला शीतल तुकाराम काळे (वय ३५, रा. शिनोली, ता. आंबेगाव) आणि तिचा पती तथा आरोपी तुकाराम हेमा काळे (वय ३८) हे गेल्या पंधरा दिवसांपासून डोंगरगण येथील डॉ. हिरामण चोरे यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करत होते. आरोपी तुकाराम काळे हा दारूच्या नशेत सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि त्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असत.
रविवारी (दि. २६) दुपारी तीनच्या सुमारास आरोपीने पुन्हा याच संशयावरून आपल्या पत्नीला खोलीत डांबून लाकडी दांडक्याने लांबपर्यंत बेदम मारहाण केली. ही मारहाण तब्बल काही तास सुरू होती. गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि शरीरावर व डोक्यावर वर्मी घाव बसल्यामुळे शीतल काळे ही जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
मुमुकादमाची सतर्कता आणि पोलिसांची कारवाई
घटनेच्या वेळी त्याच शेतावर मुकादम म्हणून काम करणारे ओमकार बाळू भिंगे यांनी खोलीच्या खिडकीतून हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ शेतमालक डॉ. हिरामण चोरे आणि आपल्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर सर्वजण घटनास्थळी धाव घेऊन आले. मात्र, संतापलेल्या आरोपीने खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला आणि बाहेर जमलेल्या लोकांवर खिडकीतून दगडफेक केली. दरम्यान, साक्षीदाराने आरोपी पत्नीला मारहाण करत असल्याचा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला.
या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षेची उपाययोजना करत आरोपीला दरवाजा उघडण्यास सांगितले, त्यानंतर आरोपीने दरवाजा उघडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने रागाच्या भरात आपणच लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
न्यायालयीन कोठडी
या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील कसून तपास पोलीस करत आहेत.
Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




