
Desh Videsh : निवडणुकीत पराभव झाल्यानंतरच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) छे़डछाडीचा मुद्दा उपस्थित केला जातो असे कठोर निरीक्षण नोंदवत, सर्वोच्च न्यायालयाने देशातील निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी करणारी याचिका मंगळवारी फेटाळून लावली. के ए पॉल या नागरिकाने दाखल केलेली याचिका फेटाळताना, ‘‘जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा ईव्हीएममध्ये छे़डछाड झालेली नसते. तुमचा पराभव होतो तेव्हा त्यामध्ये छेडछाड झालेली असते,’’ अशी टिप्पणी न्या. विक्रम नाथ आणि न्या. पी बी वराळे यांच्या खंडपीठाने केली.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे, मद्या आणि इतर वस्तूंचे वाटप केल्याबद्दल दोषी आढळलेल्या उमेदवारांवर किमान पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यासंबंधी निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावर, ‘‘इतक्या चमकदार कल्पना तुम्हाला कशा सुचल्या,’’ असा प्रश्न खंडपीठाने विचारला. आपण एका संस्थेचे अध्यक्ष असून या संस्थेने तीन लाख अनाथ आणि ४० लाख विधवांची सुटका केली आहे असे याचिकाकर्त्यांनी सांगितले. त्यावर तुम्ही या राजकीय क्षेत्रात का पडता? तुमच्या कामाचे क्षेत्र अगदी भिन्न आहे असे खंडपीठाने त्यांना सांगितले.
|
Pune : आमदारकीसाठी महायुतीत पुन्हा चढाओढ, नक्की काय आहे प्रकार ? |
लोकसभा निवडणुकीनंतर, निवडणूक आयोगाने जून २०२४मध्ये जाहीर केल्यानुसार नऊ हजार कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती दिली होती असे पॉल यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, मतपत्रिकांचा वापर केल्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही का असा उलट प्रश्न न्यायालयाने विचारला.
टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनीही यापूर्वी ईव्हीएमवर शंका व्यक्त केल्या होत्या असे पॉल म्हणाले. मात्र न्यायालयाने हा मुद्दा विचारात घेण्यास नकार दिला. यापूर्वी एप्रिलमध्येही मतदान मतपत्रिकेवर घ्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या होत्या. मतदान यंत्रामध्ये फेरफार करण्याच्या शंका निराधार असल्याचे न्यायालयाने तेव्हा म्हटले होते.
आम्हाला पैसे मिळाले नाहीत!
निवडणुकांदरम्यान पैसे वाटण्यात आले हे प्रत्येकाला माहीत आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी सुनावणीदरम्यान केला. त्यावर, ‘‘आम्हाला कोणत्याही निवडणुकांसाठी कधीही पैसे मिळाले नाहीत,’’ असे उद्गार खंडपीठाने काढले.
चंद्राबाबू नायडू किंवा जगन मोहन रेड्डी हरले तेव्हा ते म्हणाले ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते. जेव्हा ते जिंकले तेव्हा ते काहीही बोलले नाहीत. आम्ही याकडे कसे पाहायचे? आम्ही हे अमान्य करतो. तुम्ही हा युक्तिवाद करण्याची ही जागा नाही.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




