
Mumbai News : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा म्हणजेच सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने 538 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी नरेश गोयल यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांसह 7 ठिकाणांची छापे टाकले आहेत. बँकेच्या फसवणूक प्रकरणी हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेच्या 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी जेट एअरवेज आणि त्याचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबईतील घर आणि कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकले.
सीबीआयने शुक्रवारी नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि विमान कंपनीचे संचालक गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे टाकले.सीबीआयने कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून 538 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा नवीन गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजच्या अनेक माजी संचालकांसह इतर अनेक आरोपींच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात येत आहेत. दिल्ली आणि मुंबईतील जेट एअरवेजच्या कार्यालयावर, एअरवेजचे माजी अधिकारी आणि नरेश गोयल यांच्या घर आणि कार्यालया वर छापे टाकण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, जेट एअरवेजने कॅनरा बँकेकडून सुमारे 538 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. याबाबत काही सरकारी कर्मचाऱ्यांसह इतरांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
- पुणे: मुरुम चोरी पकडल्याचा राग; देऊळगाव राजे येथे तलाठ्याला राग अनावर, दोघांवर गुन्हा दाखल!
- मुंबई: महाराष्ट्र हवामान अंदाज राज्यात पावसाचा जोर वाढणार! विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा, १३ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी!
महाराष्ट्र
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- कोल्हापुर: पंचगंगेत गणपती विसर्जनासाठी बॅरिकेड्स हटवण्यावरून भाविक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची व वाद!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
- पुणे: मुरुम चोरी पकडल्याचा राग; देऊळगाव राजे येथे तलाठ्याला राग अनावर, दोघांवर गुन्हा दाखल!
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!


























Subscribe to my channel




