मुंबईत भाजपचाच महापौर, पहिला नव्हे दुसरा..
बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज बऱ्याच वर्षांनी बीएमसीला महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे. महायुतीकडून भाजपच्या रितू तावडे या महापौर असतील तर शिवसेनेचे संजय घडी हे उपमहापौरपद स्वीकारणार आहेत. अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. या निवडणुकीत महापौरपदासाठी भाजप सेनेत रस्सीखेच झाल्याचे बोलले जात होते. अखेर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. मात्र रितू तावडे यांच्या रुपाने भाजपचा पहिलाच महापौर बसणार, असा जो दावा केला जात आहे तो चुकीचा आहे. कारण यापूर्वीही एकदा भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान झाला होता.त्यामुळे यंदा रितू तावडे या महापौर झाल्या असल्या तरी भाजपचा महापौर होण्याची ही पहिली नाही, तर दुसरी वेळ आहे.
कोण होते भाजपचे महापौर ?
ती व्यक्ती म्हणजे म्हणजे भाजपचे निष्ठावान डॉ. प्रभाकर पै. तब्बल 4 दशकांपूर्वी म्हणजे 1982 ते 1983 पर्यंत डॉ. पै हे मुंबई महापालिकेचे महापौर होते. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. पै हे मूळचे कर्नाटकमधील उडपीतील बारकूर येथील निवासी होते, अशीही माहिती समोर आली आहे. त्यावेळी राजकीय समीकरणे आजच्या तुलनेत खूप वेगळी होती. तेंव्हा जनता पक्षातून फुटून भाजपची नुकतीच स्थापना झाली होती. तेव्हा भाजपचा खूप विस्तार नसला तरी पक्षाची मुंबईच्या राजकारणार चांगलीच छाप उमटल्याचे दिसून आलं.
प्रभाकर पै कोण ?
मूळचे कर्नाटकचे असलेले डॉक्टर प्रभाकर पै हे उडपीतील बारकूर येथील गावा जन्मले होते. व्यवसायाने ते डॉक्टर होते, मात्र त्यांना समाजसेवेची ओढ होती, त्यामुळेच ते मुंबईत आले. गर्भवती महिला, मलेरियाग्रस्त तरुण किंवा आजारी वृद्धांना वेळेवर मदत न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटना त्यांना अस्वस्थ करत. त्यांनी वंचितांसाठी वैद्यकीय केंद्रे उभारण्याचा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्याचा संकल्प केला. वांद्रे-खार परिसरात त्यांचा वैद्यकीय व्यवसाय खूप यशस्वी होता.
डॉ. पै हे 1968 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1968 ते 1984 या काळात त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं. आणि त्याच कालावधीत 1982 ते 1983 या काळात त्यांनी महापौरपद भूषवले. एवढंच नव्हे तर डॉ. पै यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
ज्येष्ठ पत्रकारांनी आठवणींना दिला उजाळा
भाजपचे पहिले महापौर असलेल्या डॉ. पै यांच्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी महत्वाची आठवण सांगितली. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ” मुंबईच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची सेना यांच्यात चाललेल्या अकटोविकट संघर्षात भाजपला महापौर पद मिळालेच तर जो कोणी महापौर होईल तो भारतीय जनता पक्षाचा दुसरा महापौर असेल… 1982 मध्येच डॉक्टर प्रभाकर संजीवा पै हे मुंबईचे महापौर झाले होते आणि ते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते होते याची आठवण तेव्हा त्या महापौर कार्यालयात कार्यरत असलेले ज्येष्ठ अधिकारी प्रकाश परांजपे शहापूरकर यांनी आत्ता दुपारी करून दिली.. पै यांची आठवण करून दिल्याबद्दल परांजपे यांना धन्यवाद. परांजपे यांनी आणखीही एक गोष्ट सांगितली.. पै महापौर असतानाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक शिबीर झाले होते त्या शिबिरास महापौर असलेले पै हे संघाचे अर्धी चड्डी घालून उपस्थित होते आणि त्यांच्या समवेत तिथे परांजपेही गेले होते.” अशी आठवण अकोलकर यांनी लिहीली.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




