
Pune Metro News Update : पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १२ नवीन ट्रेन येणार आहेत. त्यासाठी पुणे मेट्रोकडून ऑर्डर देण्यात आली आहे. ४३०.५३ कोटी रुपयांमध्ये नव्या १२ मेट्रो पुण्यात दाखल होणार आहेत. पुढील ३० महिन्यांच्या कालावधीत या मेट्रो ट्रेन टप्प्याटप्प्याने पुणे मेट्रोकडे दाखल होतील. या नवीन १२ ट्रेन सध्या मेट्रोच्या ताफ्यात असणाऱ्या ट्रेन सारख्याच असतील, असे समोर आले आहे.
पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्ग विस्ताराला मान्यता मिळाली आहे. या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. या दोन्ही मार्गीकांसाठी नवीन १२ मेट्रो ट्रेनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रोकडून १२ नव्या मेट्रोची ऑर्डर देण्यात आली आहे. अडीच वर्षात या मेट्रो पुण्यात दाखल होणार आहेत. नवीन १२ मेट्रोतील प्रत्येक मेट्रो ट्रेनला ३ डबे असतील, असे समजतेय.
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत १२ ट्रेन -
पुणे मेट्रोच्या विस्तार योजनेला गती मिळत असून पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गांच्या बांधकामाला मान्यता मिळाली आहे. पीसीएमसी-निगडी मार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. स्वारगेट-कात्रज मार्गासाठी लवकरच ठेकेदाराची नेमणूक होणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी पुणे मेट्रोने १२ नवीन मेट्रो ट्रेन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
|
|
प्रत्येक ट्रेनमध्ये तीन डबे असतील. या ट्रेन ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत अल्युमिनिअमपासून निर्मित केल्या जाणार असून, त्यासाठी ‘टीटागढ रेल सिस्टिम लिमिटेड’ आणि ‘टीटागढ फिरेमा’ या कंपन्यांना ४३०.५३ कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे. पुढील ३० महिन्यांत या ट्रेन टप्प्याटप्प्याने पुणे मेट्रोच्या ताफ्यात दाखल होतील.
नव्या मेट्रो कशा असतील ?
या नवीन ट्रेन सध्या कार्यरत असलेल्या ट्रेनप्रमाणेच असतील, ज्यात वातानुकूलन, स्वयंचलित दरवाजे, स्वयंचलित उद्घोषणा आणि डिस्प्ले यासारख्या सुविधा असतील. या १२ ट्रेनच्या समावेशाने पुणे मेट्रोच्या ताफ्यातील ट्रेनची संख्या ३४ वरून ४६ पर्यंत वाढणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ आणि जलद सेवा मिळेल. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, “या १२ नवीन ट्रेनमुळे पीसीएमसी-निगडी आणि स्वारगेट-कात्रज मार्गांचे बांधकाम पूर्ण होताच मेट्रो सेवा सुरू करणे शक्य होईल. याचा विशेषतः पीसीएमसी-निगडी मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा होईल.” या विस्तारामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि नागरिकांना पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




