
Vishrantwadi News : विश्रांतवाडी - दोन ते तीन दिवसांपासून सतत सायंकाळी होत असलेल्या पावसामुळे येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्डमधील आदित्यनारायण सहकारी गृहरचना संस्था मर्यादित एम 24 या इमारतीमधील सी विंगमध्ये छताचा काही भाग कोसळला. यात जीवितहानी झालेली नसली तरी इमारत धोकादायक अवस्थेत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
प्रत्येकाच्या जिवावर बेतेल अशीच घटना घडलेली आहे. यासंदर्भात येथील रहिवासी व सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत खंडाळे म्हणाले की पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू होऊन गेल्या चार-पाच वर्षें होत आलेले आहेत. म्हाडाच्या अधिकार्यांनी विकासकाने पैसे भरले की लगेचच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगितले. परंतु काही वैद्यकीय कारणांमुळे त्यांचा चार्ज आत्ताच्या अधिकार्यांच्या हातात दिला.
|
Manoj Jarange Patil : ठरलं तर मग! मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार, ठिकाण आणि तारीखही ठरली |
आत्ताचे अधिकारी यांनी आमच्या इमारतीच्या सभासदांना अंडरटेकींगचा फॉर्म भरून मागितला. तोही आम्ही सर्वांनी भरून दिला. प्रीमियमचा एक हप्ता भरूनही जवळपास एक वर्ष झाले, तरी अजून नाहरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. आता त्यांनी विकसकाचा करार मागितला असून त्यात शंभर टक्के रहिवाशांचा समावेश असावा, असे त्यांचे म्हणणे आहे. येथील काही लोकांनी आपले फ्लॅट भाड्याने दिलेले आहेत.
तर काही परदेशात राहतात, तर काहीजण इतर राज्यांत राहतात. काही लोकांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे आम्ही हा करार देऊ शकलो नाही, कारण या सर्व गोष्टींना वेळ लागणार आहे. दरम्यान जर काही दुर्घटना घडल्यास, भूकंप झाल्यास, इमारत कोसळण्याची शक्यता आहे. पहिल्याच पावसामुळे वर पाणी झिरपून स्लॅब कोसळत आहे तर पावसाळ्यातसुद्धा अतिशय बिकट अवस्था असणार आहे.
खालून तळमजल्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये घुस लागलेली असून इकडे बुजविले की तिकडून घुस खड्डे करीत असून त्यामुळे इमारतीची अवस्था अतिशय खिळखिळी करून टाकलेली आहे. पुनर्विकास करण्यासाठी एक्कावन्न टक्के, साठ टक्के, सत्तर टक्के अशी सभासदांची जरी संमती असेल तरीही चालेल, असे सर्वांना वाटते आहे.
परंतु डेव्हलपमेंट करार हा शंभर टक्के सभासदांनी करून देणे आवश्यक आहे. तरी म्हाडाच्या अधिकार्यांनी सहकार्य करून ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात म्हाडाचे अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले की आमच्याकडून प्रक्रिया सुरू असून नियमाप्रमाणे डेव्हलपमेंट करार होऊन विकसकाकडून प्रिमियम येणे बाकी आहे. त्यामुळे नाहरकत पत्र देणे राहिले आहे. या सोसायटी आणि विकसक यांच्यातील अंतर्गत गोष्टी आहेत. त्यामुळे आमच्याकडून कोणतेही काम रखडले नाही.
परंतु डेव्हलपमेंट करार हा शंभर टक्के सभासदांनी करून देणे आवश्यक आहे. तरी म्हाडाच्या अधिकार्यांनी सहकार्य करून ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात म्हाडाचे अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले की आमच्याकडून प्रक्रिया सुरू असून नियमाप्रमाणे डेव्हलपमेंट करार होऊन विकसकाकडून प्रिमियम येणे बाकी आहे. त्यामुळे नाहरकत पत्र देणे राहिले आहे. या सोसायटी आणि विकसक यांच्यातील अंतर्गत गोष्टी आहेत. त्यामुळे आमच्याकडून कोणतेही काम रखडले नाही.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



