
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार बाहेर काढले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषणाची घोषणा करत राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. येत्या ४ जूनपासून ते उपोषणाला बसणार आहेत. हे उपोषण बेमदत असणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी उपोषणाबाबत घोषणा केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जरांगे पाटील संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर येथे आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यांनी उपोषणाची घोषणा करत तारीख आणि ठिकाणाची माहिती दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'सगेसोयरेसाठी पुन्हा उपोषण आणि आंदोलन करणार आहे. ४ जून रोजी सकाळी ९ वाजता अंतरवाली येथे उपोषण सुरू करणार. तर ८ जून रोजी नारायण गडावर सभा घेणार आहे. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. ६ कोटी मराठा समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे.' तसंच, 'मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या. १० टक्के आरक्षण दिले ते कुणाच्याही फायद्याचे नाही. त्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे.' असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले.
|
|
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी पीएम मोदींवर निशाणा देखील साधला. त्यांनी सांगितले की, 'मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा घेत नव्हते पण यावेळी त्यांना मराठ्यांमुळे जिल्हा जिल्ह्यात सभा घ्याव्या लागल्या. मोदी हे गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या ४-५ जणांमुळे आली. आम्ही भाजपविरोधी नाही.' तसंच, 'सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा जर अध्यादेश नाही काढला तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार. जर सरकारने मान्य केले तर आम्ही राजकारणात पडणार नाही.', असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यासोबत, 'मला आता समाजाला आवाहन करण्याची गरज वाटत नाही. मराठा समाजाला आता सगळं काही माहिती आहे. एका मुलाप्रमाणे ते माझी काळजी घेत आहेत. माझे उपोषण सुरु झाल्यानंतर मराठा समाज गावोगावी शांततेत आंदोलन करतील.' असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. तसंच, 'लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा समाज नाही. आम्ही कुणाचाही प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचे आम्ही आवाहन केले नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचे आवाहन मी केले आणि कोणाला पाडायचे हे मराठा समाजाला चांगलेच माहिती आहे.', असे त्यांनी सांगितले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
महाराष्ट्र
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!



























Subscribe to my channel




