बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला धमकी दिल्याबद्दल मुंबई गुन्हे शाखेने लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य हरिचंद्र उर्फ हॅरी बॉक्सर याच्याविरुद्ध लूक आउट सर्क्युलर (LOC) जारी केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगच्या मॅनेजरला मिळालेल्या धमकीच्या व्हॉइस नोटची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी पंजाब आणि हरियाणा येथे एक पथक पाठवलं होतं. व्हॉइस नोट पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर म्हणून करून 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मुंबई पोलिसांना या धमकीच्या व्हॉइस नोटची माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी एक पथक पंजाब आणि हरियाणा पाठवलं… तेथून व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरचा असल्याची पुष्टी केल्यानंतर, एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रणवीर सिंगचे मॅनेजर विजय सुब्रमण्यम यांच्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांनी हॅरी बॉक्सरविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मुंबई पोलीस क्राईम ब्रांचच्या खंडणीविरोधी सेलसोबत मिळून या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. रणवीरच्या मॅनेजरच्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरचाच असल्याची पुष्टी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, यासंदर्भातील इतर ठोस पुरावे गोळा करण्याचं काम क्राइम ब्रांचकडून सुरू आहे. रणवीरच्या मॅनेजरला अमेरिकन मोबाइल नंबरवरून धमकीचा व्हॉइस नोट पाठवण्यात आला होता.
सांगायचं झालं तर, गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना येणाऱ्या धमक्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री हिमांशी खुरानाला खंडणीची मागणी करत धमकी देण्यात आली. हिमांशीकडेही 10 कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली होती.
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता रोहित शेट्टी याच्या मुंबईतील जुहू येथील घरावर देखील गोळीबार करण्यात आला होता. रोहित याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली. त्यानंतर अभिनेता सलमान खान याची बहिण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा याला देखील धमकी देण्यात आलेली. त्यानंतर आयुष आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली.
अभिनेता सलमान खान याला देखील अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर, सलमान यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावर देखील गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




