मुंबई: "देशातील सत्ताधाऱ्यांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजेत. ट्रम्प यांनी धमकी दिल्याने 'ऑपरेशन सिंदूर' थांबवले गेले, पण आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे," अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
निवडणुकीसाठी भाजपचा 'प्लॅन' तयार
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, केंद्राला बंगालमध्ये हिंसाचार पेटलेला हवा आहे, जेणेकरून त्याचे लोण देशभर पसरेल. "ममता बॅनर्जी यांची भूमिका स्पष्ट आहे की कपट रचून त्यांचा पराभव घडवण्यात आला. १०० जागा लुटल्या गेल्या आणि ९० लाख मते कापली गेली. भाजपला देशभर आग लावायची आहे आणि पुढील दोन वर्षांत अशांतता निर्माण करून लोकसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, हाच त्यांचा प्लॅन आहे," असा दावा राऊत यांनी केला.
राज्यपालांच्या भूमिकेवर कडक टीका
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर बोलताना राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तामिळनाडूमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले जात नाही, यावरून त्यांनी भाजपवर 'कोश्यारी' वृत्तीचे राज्यपाल नेमल्याची टीका केली. पंजाबमधील स्फोटांचा संदर्भ देत त्यांनी भाजप निवडणुकांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, असेही म्हटले.
हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर भाजपचेच नाव नाही
नाशिकच्या काळाराम मंदिरातील कार्यक्रमावरून राऊत यांनी भाजपच्या हिंदुत्वावर सडकून टीका केली. "माजी राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजा फडकवून भाजपने हिंदुत्वावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. भाजपला असे वाटते की जगातील हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर केवळ त्यांचेच नाव आहे. काळाराम मंदिराचा संबंध शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी आहे, या कार्यक्रमाला ठाकरेंना किंवा त्या कुटुंबातील कोणालातरी बोलवायला हवे होते," असे ते म्हणाले.
'हनुमाना'चा अवमान करू नका
अयोध्या आणि नाशिकमधील धार्मिक प्रतिकांच्या वापरावरून राऊत यांनी भाजपला सुनावले. "धर्मध्वजावर हनुमानाचे चित्र लावले जाते, हनुमान निष्ठावान होते पण तुम्ही सर्व 'गद्दार' तुमच्या पक्षात घेतले आहेत. तुमच्या पक्षातील लोक हनुमान आहेत का? आमच्याकडील सर्व हनुमान तुम्ही पळवले आहेत, आता तरी हिंदुत्वाला बदनाम करणे थांबवा," असा टोला त्यांनी लगावला.
कुंभमेळ्याच्या बजेटवरून सवाल
नाशिक कुंभमेळ्यासाठी ३ लाख कोटींचे बजेट असल्याच्या बातम्यांवर राऊत यांनी शंका उपस्थित केली. "इतक्या मोठ्या रकमेचे नक्की काय काम होणार? की केवळ गुजरातच्या ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी हा आकडा फुगवण्यात आला आहे? कुंभमेळा मंत्र्यांनी ३५ हजार कोटींच्या कामांचा हिशोब स्पष्ट करावा," अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!




























Subscribe to my channel



