राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून अंतिम निकाल आता हाती आला आहे. महानगर पालिकांच्या निकालाप्रमाणेच या निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे. 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर 2 ठिकाणी शिवसेना आणि 2 ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जिल्हा परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. कोणत्या जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाने विजय मिळवला ते सविस्तर जाणून घेऊयात.
कोणत्या जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता?
राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. यात सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्हा परिषदांवर भगवा फडकवला आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने शानदार विजय मिळवला आहे. सांगलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिलवला आहे.
कोणत्या पक्षाने किती जिल्हा परिषदा जिंकल्या?
- भाजप (7) – सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा, सोलापूर.
- शिवसेना (2) – रायगड, रत्नागिरी
- राष्ट्रवादी (2) – पुणे, कोल्हापूर
- राष्ट्रवादी शरद पवार (1) – सांगली
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
सिंधुदुर्ग मध्ये भाजपने 50 पैकी 27 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे, तर शिवसेनेला 14 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळाल्या आहेत. साताऱ्यात भाजपला 65 पैकी 24 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला 23 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. सोलापूरमध्ये भाजपला 68 पैकी 42 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 63 पैकी 23 आणि शिवसेनेला 21 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. परभणीत 54 पैकी भाजपला 24 आणि राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. धाराशिवमध्ये भाजपला 55 पैकी 18 आणि शिवसेनेला 15 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. लातूरमध्ये भाजपला 59 पैकी 18 आणि राष्ट्रवादीला 12 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी काँग्रेसला 23 जागा मिळाल्या आहेत, मात्र काँग्रेसला बहुमत गाठता येणार नसल्याचे समोर आले आहे.
पुण्यात राष्ट्रवादीचा विजय
पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार आहे. पुण्यातील 73 पैकी 51 जागांवर राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूर मध्ये राष्ट्रवादीला 68 पैकी 20, भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी महायुती सत्ता स्थापन करणार आहे. रायगडमध्ये शिवसेनेने 59 पैकी 21, भाजपने 15 आणि राष्ट्रवादीने 16 जागांवर विजय मिळवला आहे. तर रत्नागिरीत 56 पैकी 40 जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे.
[embedded content]
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




