प्रत्येक व्यक्ती सतत मानसिक स्तरावर काहीतरी विचार करत असतो. व्यक्ती बोलत नाही म्हणजेच तो शांत आहे असे नसते. त्याच्या मनात अनेक विषयाचे विचारमंथन चालू असते. मनातील विचारात मतभेद असतील तर अंतर्द्वंद्व ही चालू असते. मानसिक पातळीवरही व्यक्ती सतत संघर्षरत असतो. संघर्ष ही परस्पर मानव संबंधांमध्ये सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. जेव्हा दोन व्यक्तींच्या मध्ये सहकार्य आणि सहयोग नसतो अथवा जेव्हा ते एक दुसऱ्याच्या बाबतीत तटस्थही नसतात, अशावेळी त्यांच्यामध्ये परस्पर संघर्षाची स्थिती उत्पन्न होते. पदार्थ सीमित असतात. इच्छा, आकांक्षा व्यापक असतात. सीमित उद्देशांना ज्यावेळी अनेक व्यक्ती प्राप्त करू इच्छितात त्यावेळी त्यांच्यामध्ये संघर्ष हा स्वाभाविक होतो. वास्तविकतः संघर्ष हे परिवर्तनाचे एक साधन आहे. प्रगतीच्या मार्गामध्ये संघर्ष आवश्यक अशा स्वरूपात येतोच. परिवर्तन आणि उत्कर्ष यासाठी केला जाणारा संघर्ष स्वीकार करावाच लागतो. फक्त या संघर्षाचे स्वरूप हिंसक, स्वतःला अथवा दुसऱ्याला इजा पोहोचवणारे नसावे. सिमित वस्तूसाठी स्पर्धेमध्ये परस्पर संघर्ष आणि हिंसा होते. सामंजस्य आणि सहिष्णुता पूर्वक इतरांच्या इच्छा,अपेक्षा, आकांक्षा आणि विचार यांचा आदर केला तर हा संघर्ष टळू शकतो. संघर्षाचे बीजारोपण व्यक्ती कुटुंबाच्या बाहेर येतो त्यावेळेस तो समाजामध्ये समाविष्ट होतो. समाजामध्ये परस्पर व्यवहार आणि भाषा या माध्यमातून व्यक्ती-व्यक्तींचा संपर्क येतो. हा संबंध होत असताना संबंधित व्यक्तींची मानसिक स्थिती सकारात्मक असेलच असे नव्हे. कोणत्याही दोन व्यक्तींची मानसिक स्थिती एकावेळी सारखी असू शकत नाही. मानसिक अशांतीमुळे परस्पर संघर्षाची बीजे रोवली जातात. मनात द्वंद्व चालू होते आणि अशांतीयुक्त अशा शीतयुद्धाचा आरंभ होतो. मैत्री अथवा प्रेम जेव्हां व्यवहाराशिवाय देखील दोन व्यक्तीचे परस्परात संबंध असतात तेव्हा ती मैत्री अथवा प्रेम असते. परस्पर नात्यातील गतिशीलता भावनिक आणि जैविक घटकावर अवलंबून असते. एखाद्याशी आपण सुरक्षितपणे जोडले गेलो आहोत असा विश्वास असल्यास परस्पर संबंधांमध्ये मधुरता आणि दृढता असते. परंतु परस्पर आवड-निवड, विषय भेद, मतभेद,अविश्वास, समज-गैरसमज, त्रयस्थ हस्तक्षेप यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. दोन व्यक्तींमध्ये परस्पर संबंध असतात तेव्हां त्याचा आधार व्यवहार, मित्रत्व, सहकार्य, प्रेम इत्यादी असतो. आपण स्वतःहून दुसऱ्याच्या विचार,उत्कर्ष,सुख,समाधान आणि उद्देशाला किती महत्त्व देतो यावर त्या बंधनाची मजबुती अवलंबून असते. मानसशास्त्रानुसार दोन व्यक्ती अति अधिक काळ सोबत किंवा एकत्र राहिल्याने सुद्धा त्यांच्यामध्ये परस्पर संबंधात कटूता निर्माण होते. अनेक वेळा हा थोडासा दुरावा देखील परत संबंध दृढ होण्याचे कारण बनत असतो. कटुता का निर्माण होते? परस्पर संबंधांमध्ये ज्यावेळी एक व्यक्ती दुसऱ्याची आवड किंवा उद्देशाच्या प्राप्तीस यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या प्रयत्नामुळे संबंधित व्यक्तीचा, ज्याच्याशी मित्रत्व किंवा प्रेम आहे त्याचा जितका अधिक उत्कर्ष साधत असेल तितका अधिक परस्पर संबंध दृढ होत असतो. कारण त्यामध्ये एकाचे हित साधून तो दुसऱ्यास आभारयुक्त प्रेम परतावा देत असतो. परंतु याउलट काही वेळा मित्र किंवा संबंधित व्यक्ती आपल्या उद्देशाच्या साध्यामध्ये संपूर्णपणे प्रयत्नरत नाही असे वाटल्यास अथवा संशय आल्यास यासंबंधी कटूता निर्माण व्हायला सुरुवात होते. मित्रत्व किंवा प्रेम याचा आधार आणि उद्देश परस्पर संबंधातून सुख, समाधान आणि शांतीपूर्ण सह-अस्तित्व हाच असतो. परंतु कालांतराने ज्यावेळी या संबंधांमध्ये एका व्यक्तीच्या मनात लोभ, मोह, राग, द्वेष इत्यादी कारणांनी कटुता निर्माण होते, त्यावेळी ती परस्पर संबंध व व्यवहारांमध्ये उतरते आणि दुरावा वाढत जातो. अशा परिस्थितीमध्ये परस्पर वाद-विवाद ही होतात, संबंधांमध्ये स्थगिती निर्माण होते. या स्थितीच्या स्वरूपाला मौन समजले जाते, परंतु ते मौन नसते तर अशांतिपूर्ण अंतर्द्वंद्व असते. त्याला कलह असेही म्हणतात. हा कलह काळ अधिक असेल तर त्यात अधिक प्रमाणामध्ये कटूता वाढत जाते. आणि याचाच परिणाम परस्पर संबंध संपुष्टात येण्यात होतो. वाद-विवाद हा संबंधच कलहपूर्ण मानसिक अशांतीच्या अवस्थेमध्ये प्रेम वास्तव्य करू शकत नाही. परंतु यापेक्षा जर वादविवाद होत असतील, ते अधिक काळ देखील घडत असतील तरी मात्र तो एक प्रकारचा संबंधच असतो. संबंध आहे, असावा. तो कसा आहे हा नंतरचा विषय. संबंध असल्यास त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. मानसिक परिवर्तन अथवा मध्यस्थतेने विवादयुक्त संबंधात सुधार विचार परिवर्तनाने होऊ शकतो. विरोध व्यक्तीचा नको एक प्रसिद्ध असे वक्तव्य आहे. पापाची घृणा करावी पापी व्यक्तीची नव्हे, अविचाराचा तिरस्कार करावा व्यक्तीचा नव्हे, हिंसेचा विरोध करावा हिंसा करणाऱ्या व्यक्तीचा नव्हे. याचा अर्थ विरोध, राग आणि द्वेष हा दुष्पवृत्तीचा करावा, व्यक्तीचा करू नये. हा विचार व्यापक झाला पाहिजे. परस्पर कटुता, विरोध, वाद-विवाद, संघर्ष युक्त स्थिती यामध्ये सूक्ष्म विचार केला तर एक साम्य असते आणि ते म्हणजे हा वाद विवाद, विरोध एकाच उद्देशासाठी असतो. समान उद्देशासाठी होत असलेला परस्पर विरोध संपू शकतो असा विश्वास परस्पर संबंध मधुर आणि दृढ होण्याचा प्रमुख आधार आहे. विवादाचा आधार समानता याचाच अर्थ असा होतो की कसल्याही प्रकारचे परस्पर संबंध नसल्यापेक्षा वाद-विवाद, घृणा, संघर्ष,राग आणि द्वेष स्थिती असलेली बरी, कारण त्या ठिकाणी विचार परिवर्तन आणि सुधारणेला वाव असतो. मानवी हृदय असे आहे की त्यामध्ये दया, करुणा, प्रेमाचे बीज रोवले जाऊ शकते. तुझ्यातला आणि माझ्यातला संघर्ष हेच दर्शवत असतो कोणती तरी एक गोष्ट आपल्यामध्ये समान आहे. फक्त ती कशी असावी यासाठी हे भांडण चालू आहे. मला वाटतं या समस्येशी लढले पाहिजे, न की एक दुसऱ्याशी. विवादामध्ये सुद्धा विवेक पूर्ण सावधानतेने परस्पर कुटुतेचा काळ कमी केला जाऊ शकतो. कटुतेचे प्रेमात रुपांतरण काळ परिवर्तनाला कारणीभूत असतो. मग ते परिवर्तन अजीव वस्तूमध्ये असो जीवांमध्ये. काळानुसार परिस्थिती बदलते. वस्तूची परिस्थिती बदलते तसे जीवाचे विचारही बदलतात. बदललेल्या विचारामुळे मानसिक स्थितीत परिवर्तन होते. कौटुंबिक स्थिती, आर्थिक परिस्थिती, उद्देश आणि गरजांची अपूर्ती आणि वयोमानानुसार सहनशीलता कमी अधिक होत असते. म्हणूनच अशा मानसिक स्थितीत असलेल्या दोन्ही व्यक्तीच्या संबंधांमध्ये मधुरतेचा परिणाम स्वरूप अभाव निर्माण होऊ शकतो. या सूक्ष्म मानसिक स्थितीचा विचार केला आणि परस्परांमध्ये निर्माण झालेली नावड , कटुता, विवाद याचा मुख्य आधार आणि उद्देश दोघांपैकी एकाचे म्हणजेच परस्परांचे सुख समाधान याची प्राप्ती हाच आहे हे लक्षात आले तर या संघर्षाचे, विवादाचे आणि कटुतेचे पुन्हा मित्रत्व आणि प्रेमामध्ये रूपांतर व्हायला काहीच वेळ लागणार नाही असा मला विश्वास वाटतो. म्हणूनच संबंध नसल्यापेक्षा, पोकळी असल्यापेक्षा वाद-विवाद आणि संघर्षपूर्ण स्थिती कधीही प्रेमाला अंकुरित करू शकते. (बलराज संघई, 9420015108 / वाळूज औद्योगिक परिसर, छत्रपती संभाजीनगर)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
महाराष्ट्र
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू
अंबेडकरनगरमध्ये व्होल्वो बस-ट्रकची भीषण धडक; ४ प्रवाशांचा मृत्यू
सुरत-उदयपूर वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?

























Subscribe to my channel




