‘सार्वभौमत्व’ हा या वर्षातील सर्वाधिक वापरला जाणाराशब्द ठरू शकतो. ट्रम्प यांनी याला चलनात आणले आहे.जागतिकीकरणावर गेल्या तीन दशकांपासून जे एकमत झालेहोते, ते त्यांनी मोडून काढले आहे. त्या सहमतीने मित्र-देशआणि सहकाऱ्यांसोबतच्या आघाडीत आपले सार्वभौमत्वसामायिक करण्याचे फायदे दाखवले होते. परंतु, ट्रम्प यांनीकॅनडापासून भारतापर्यंत प्रत्येक देशाला सार्वभौमत्वाचेमहत्त्व पुन्हा समजून घेण्यास भाग पाडले . याला तुम्ही आपल्या वसाहतवादी इतिहासाशी जोडूनपाहू शकता किंवा पाश्चात्त्य देशांच्या (अमेरिका)दबावाशीही जोडू शकता, कारण पाकिस्तान त्यांचासहकारी बनला होता. 1974 आणि 1998 मध्येपोखरणमधील अणुचाचण्यांनंतर आपल्यावर आर्थिकनिर्बंध लादले गेले आणि आपल्याला तंत्रज्ञानापासून वंचितठेवले गेले. आपल्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर‘रोखा, मागे घ्या आणि संपवा’ या काळातील जो दबावपडला, तो अमेरिकेच्या बाजूनेच होता. सार्वभौमत्वाबाबतभारतात जो व्यापक विचार होता, त्याकडे अमेरिका-विरोधम्हणून पाहिले जाऊ लागले. या अनुभवाने अशाराष्ट्रवादाला जन्म दिला, जो मजबूतही होता आणिअमेरिकेबद्दल संशयाने भरलेलाही. ‘विदेशी हात’ यालानेहमीच अमेरिकेचा हात मानले गेले. त्याचे विरोधक,म्हणजेच सोव्हिएत युनियन आणि त्यांचे सोबती, भारताचेनैसर्गिक मित्र मानले गेले. परंतु हे तोपर्यंतच राहिले, जोपर्यंत1990-91 मध्ये सोव्हिएत युनियन संपुष्टात आले नाही.तेव्हापासून भारत या नवीन, एकध्रुवीय जगात स्वतःसाठीजागा बनवण्याच्या प्रयत्नात आहे. याचा परिणाम असाझाला की भारत हळूहळू पश्चिमेकडे झुकत गेला. भारताचाप्रत्येक नेता या विवंचनेचा सामना करत आला आहे की,शीतयुद्धानंतरच्या जगात कोणत्याही एका गटात न जातासंबंध कसे प्रस्थापित करावेत.
भारताचा तणावपूर्ण शेजार त्याच्या धोरणात्मक पर्यायांना मर्यादित करतो. ही भारताची दुहेरी कोंडी आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध नेहमीच तणावाचे असतात आणि चीनकडून नेहमीच धोका असतो. अमेरिकेची इच्छा आहेकी भारताने एकाच वेळी अनेक आव्हाने पेलावीत. तथापि भारतासाठी चीन-पाकिस्तान युती हे अधिक मोठे आव्हान आहे. याला दुहेरी कोंडी यासाठी म्हटले जाते, कारण भारताला आपले सैन्य नेहमीच सज्ज ठेवावे लागते. बरेचसे लष्करी साहित्य रशियन बनावटीचे आहे आणि या अवलंबित्वेतून लगेच सुटका होऊ शकत नाही. याशिवाय भारताच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये, जसे की अणु पाणबुडी (एसएसएन), रशियाची मोठी भूमिका आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, दोन आघाड्यांवरचा संघर्ष टाळण्यासाठीभारताला चीनसोबतही संबंध टिकवून ठेवावे लागतात, मग यासाठी व्यापारात काही तडजोडी का कराव्या लागेनात. संबंध टिकवून ठेवण्याचा अर्थ असा आहे की भारत युक्रेनच्या मुद्द्यावर रशियाविरुद्ध फार कठोर भूमिका घेऊ शकत नाही किंवा ट्रम्प यांच्या त्या दाव्याची उघडपणे पुष्टीकरू शकत नाही की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणेबंद केले आहे. ही परिस्थिती गुंतागुंतीची आहे, कारण युक्रेन युद्धापूर्वी जेव्हा युरोप व अमेरिकेला वाटत होते की भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे, जेणेकरून जागतिक किंमत संतुलित राहील, तेव्हा भारत त्यातून खूप कमी तेल खरेदीकरत असे. त्या काळी रशियाचे तेल भारताच्या ऊर्जासुरक्षेसाठी आवश्यक आहे, असेही म्हटले जात नसे. पणआता परिस्थिती उलट आहे. आज जनमताचा दबाव आहेकी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली जावी आणिसांगितले जावे की आम्ही एक सार्वभौम देश आहोत.
भारताच्या मागील सरकारांनी अमेरिकन दबावाकडेदुर्लक्ष केले होते आणि इंदिरा गांधींनी रिचर्ड निक्सन आणिहेन्री किसिंजर यांचा खंबीरपणे सामना केला होता, याचीआठवण काढली जाते. पण हे पूर्ण सत्य नाही. दुसरे सत्य हेआहे की इंदिरा गांधी दुसऱ्या गटाच्या, म्हणजेच सोव्हिएतयुनियनच्या जवळ गेल्या होत्या. आपले सरकारवाचवण्यासाठी त्यांना कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा हवा होता,म्हणून 1969 नंतर भारताचा कल सोव्हिएत युनियनकडेवाढला. 9 ऑगस्ट 1971 रोजी भारत सोव्हिएत युनियनचासहकारी बनला. हा करार खूप मजबूत नव्हता, परंतु यातपरस्पर सुरक्षेची बाब समाविष्ट होती. याचा फायदा तेव्हाझाला जेव्हा अमेरिकेचा ‘सातवा ताफा’ भारतावर दबावटाकण्यासाठी आला होता. सोव्हिएत युनियनने संयुक्तराष्ट्रात ‘व्हेटो’ केला आणि भारताला लष्करी साहित्यलवकर उपलब्ध करून दिले, ज्यात पोलंडमधून आलेलेटी-55 टँकही समाविष्ट होते. त्याच वेळी, अमेरिकेचा नवीनसहकारी चीन पाकिस्तानला शस्त्रे पुरवत होता. 1971च्या विजयाने इंदिरा गांधी आणि भारत दोघांची प्रतिष्ठावाढवली आणि निक्सन सरकारला लाजवले, पण याचाअर्थ असा होता का की भारत पूर्णपणे सार्वभौम झालाहोता? नाही. भारताला अनेक प्रकरणांमध्ये सोव्हिएतयुनियनचे समर्थन करावे लागले, जसे की कंबोडिया आणिअफगाणिस्तानच्या मुद्द्यावर. अफगाणिस्तानमुळेभारतासमोर नवीन धोरणात्मक समस्या निर्माण झाल्या.यामुळे अमेरिका-पाकिस्तान संबंध मजबूत झाले, जिहादीसंस्कृती वाढली आणि पाकिस्तान अणुशक्ती बनला. 1969 ते 1989 दरम्यान भारताने आपल्या सार्वभौमत्वाशीतडजोड केली का? उत्तर आहे- नाही. सार्वभौमत्व हा काहीकायमस्वरूपी शिक्का नसतो. अमेरिका असो वा चीन,प्रत्येक देशासाठी सार्वभौमत्वाचा अर्थ आपले निर्णयघेण्याचे स्वातंत्र्य आहे. शीतयुद्धात भारताने सोव्हिएतयुनियनशी संबंध जपले. नंतर अमेरिकेसोबत संबंधसुधारले, रशियासोबतचे संबंध कायम ठेवले, चीनसोबतस्थिरतेचा प्रयत्न झाला आणि पाकिस्तानचा सामनाकरण्याची शक्ती वाढवली गेली. पाहिले तर कोणताही देशपूर्णपणे सार्वभौम नसतो. सर्वजण आपले निर्णय आणिकरार करतात. आज जग एकमेकांवर अवलंबून आहे, जिथेसार्वभौमत्वाकडे लवचिक पद्धतीने पाहावे लागते. सर्व देशनवीन आघाड्या बनवत आहेत आणि आपल्या हितानुसारनिर्णय घेत आहेत. एकदा मी माकप नेते हरकिशनसिंहसुरजित यांना विचारले की, तुम्ही त्या सरकारांना पाठिंबाका देता जे अमेरिकेशी संबंध सुधारतात? त्यांनी उत्तर दिले:भारताला तंत्रज्ञान हवे आहे. पूर्वी हे सोव्हिएत युनियनकडूनमिळायचे, आता मिळत नाही. म्हणून आता अमेरिकेचीगरज आहे. आपण आपल्या राष्ट्रीय हितानुसार काम केलेपाहिजे. सार्वभौमत्वावर हा एक महत्त्वाचा धडा आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) विचारधारा आणि नैतिकतेचेमहत्त्व आता कमी झाले आहे.कोणताही देश पूर्णपणे सार्वभौम नसतो.सर्वजण आपले निर्णय आणि करारकरतात. आज जग एकमेकांवर अवलंबूनआहे. जगातील सर्वच देश आता नवीनआघाड्या बनवत आहेत आणि आपल्याहितानुसार निर्णय घेत आहेत. विचारधाराआणि नैतिकतेला आता पूर्वीसारखे महत्त्वउरलेले नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




