अनेक संमिश्र, ऊन-सावलीसारख्या भावनांसह मीछत्तीसगडचा निरोप घेतला. या राज्यात मी जवळपासदोन आठवडे घालवले. या काळात रात्री उशिरापर्यंतसाल वनस्पतीच्या दाट जंगलातून मोटारसायकलवरूनप्रवास केला होता. चांदण्यात चमकणारी, पाने गळूनगेलेली पांढरट भुताटकी झाडे एक विलक्षण दृश्य निर्माणकरत होती. दुर्गम आदिवासी वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठीवाहत्या नद्या पार कराव्या लागल्या. बस्तर आणि कवर्धा येथील प्रवासात मी जंगलाच्या आतअसलेल्या गोंड जमातीच्या गावात राहिले. तेथेवीजेसारखी मूलभूत सुविधाही नव्हती. नक्षलप्रभावितम्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात मी यजमानकुटुंबासोबत शेकोटीजवळ बसून आदिवासीजीवनातील गुंतागुंत व त्याबाबत समाजात प्रचलितगैरसमज समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. धुरवाजमातीचे पारंपरिक उत्सव पाहिले. एका पारंपरिक वैद्याच्या झोपडीत औषधी वनस्पतींसोबतपक्ष्यांचे पंजे व अनेक वर्षांपूर्वी जमा केलेले खवल्यामांजराचे खवलेही पाहायला मिळाले. दुर्गम गावांत धातू आणि बांबूपासून हस्तकला करणाऱ्या कलाकारांनाभेटले. त्यांचे असामान्य जीवन आणि दुर्मीळ कौशल्य‘इतर मागासवर्ग’ या सरकारी वर्गीकरणामागे जणूझाकोळून गेले आहे. स्थानिक आदिवासी बाजारात तेंदूपानाच्या द्रोणात मला लांदा हे तांदळापासून बनविलेले पारंपरिक पेय प्यायला मिळाले. ते किंचित दाणेदार असते. एका विशालमोहाच्या झाडाखाली बैगा जमातीच्या प्रेमळ कुटुंबाचीभेट झाली. ते मोहाची दारू तयार करत होते. सकाळचानाश्ता करून बराच वेळ झाला नसतानाही त्यांनीपानाच्या द्रोणातून त्या गरम आणि तीव्र पेयाची चवचाखल्याशिवाय मला जाऊ दिले नाही. आजहीकपाळावर, हातांवर आणि पायांवर पारंपरिक गोंदणगोंदवून घेणाऱ्या बैगा समाजातील महिलांनाही भेटले. त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरातआपले आयुष्य जगतात.त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरातआपले आयुष्य जगतात. संध्याकाळी तीरथगड धबधब्याच्या प्रचंड वेगानेकोसळणाऱ्या पाण्याच्या तुषारांत उभे राहून मलाअचानक स्वातंत्र्याचीविलक्षण अनुभूती आली होती. तोक्षण आणखी काही काळ अनुभवत राहावे, अशीमनापासून इच्छा झाली होती. मात्र, छत्तीसगडच्याआदिवासी समाजात वावरताना मनात एक खोलउदासीही सतत होती. कारण जुने विधी, पारंपरिकपोशाख, केशरचना, जंगल आणि आदिवासी हाटातीलसामाजिक संवाद या सर्व गोष्टी आधुनिकतेच्या लाटेतहळूहळू वाहून जात आहेत. याकडे मात्र कुणाचे लक्षदिसत नाही. एकेकाळी भरड धान्य, कोदो, शेवगा आणिमोहासारख्या पौष्टिक पारंपरिक अन्नावर आधारलेलाआदिवासींचा आहार आता तांदूळ आणि डाळीपुरतामर्यादित झाला आहे. परिणामी कुपोषण वाढले. जंगलआणि त्यातील संसाधनांचा शाश्वत तसेच‘शून्य-कचरा’ तत्त्वावर वापर करण्याचे त्यांचे समृद्धपारंपरिक ज्ञानही हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.या समुदायांनी शतकानुशतके या अमूल्य जंगलांचेसंरक्षण केले. त्यांनाच जंगलापासून दूर केले गेले आहे.वनसंरक्षणाच्या तथाकथित आधुनिक पद्धतींमुळे हाफटका बसू लागला आहे. अनेक आदिवासी समाजांचा जंगलाशी असलेलापारंपरिक संबंधही आता तुटत चालला आहे. आदिवासीकुटुंबांसोबत राहताना, ताऱ्यांनी भरलेल्याआकाशाखाली एका ओझासोबत भोजन करताना आणिसामाजिकदृष्ट्या प्रगत परंपरांच्या कथा ऐकताना माझ्यामनात एकच विचार वारंवार येत राहिला. आदिवासीवडीलधाऱ्यांची आजची पिढी ही भारताच्या प्राचीनस्वदेशी ज्ञानपरंपरेचे जतन करण्याची आपल्याकडेउरलेली कदाचित शेवटची संधी आहे. निसर्गाशी शाश्वत सहअस्तित्व कसे राखावे, हे ज्ञानत्यांच्याकडे आहे. या समुदायाच्या रक्तात आजही जंगलवाहते. अशा त्यांच्या मुलांना केवळ अकुशल मजूरबनविण्याऐवजी त्यांना निसर्गतज्ज्ञ, पर्यटन मार्गदर्शकआणि वनसंरक्षक म्हणून प्रशिक्षित करता येईल. भौतिक लालसा आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाने ग्रासलेल्याया जगात छत्तीसगडच्या प्रवासाने मला पुन्हा एकदाजाणवून दिले की, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपणवाटेत किती मौल्यवान गोष्टी गमावण्याचा धोका पत्करतआहोत. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) भौतिक लालसा, पर्यावरणाच्या ऱ्हासानेग्रासलेल्या या जगात छत्तीसगडच्याप्रवासाने मला पुन्हा एकदा जाणवून दिलेकी, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपणवाटेत कितीतरी मौल्यवान गोष्टीगमावण्याचा धोका पत्करत आहोत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




