‘हे आरोपपत्र म्हणजे एक चेष्टा आहे.’- असे ट्विशा शर्माचे वडील नवनिधी शर्मा मला म्हणाले. त्यांचा आवाज कापत होता, गळा दाटून आला होता. ट्विशाच्या मृत्यूच्या बहुचर्चित प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावर ते आपली प्रतिक्रिया देत होते. कारण सीबीआय या निष्कर्षावर पोहोचली आहे की, ट्विशाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला होता. तिची हत्या झाली नव्हती. ट्विशाचा भाऊ मेजर हर्षित म्हणाला की, ज्या गोष्टीचा आम्हाला आधीपासूनच संशय होता, तीच गोष्ट सांगण्यासाठी सीबीआयने आम्हाला 90 दिवस लावले. सीबीआय ज्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आणि ते विचारण्यात अपयशी ठरली, अशा अनेक प्रश्नांची यादीच त्याने मला वाचून दाखवली. आणि त्याचे बरोबर आहे; कारण सीबीआयच्या सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या अंतिम अहवालात अनेक गंभीर त्रुटी आणि विरोधाभास आहेत. सीबीआयचे निष्कर्ष पूर्णपणे एम्समध्ये (दिल्ली) झालेल्या दुसऱ्या शवविच्छेदनावर आधारित आहेत. ट्विशाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सीबीआयने या प्रकरणातील सर्वात धक्कादायक पैलूची सखोल चौकशी केली नाही. उपनिरीक्षक दिनेश शर्मा यांनी घटनास्थळावरून तो जिम बेल्ट (लिगेचर) जप्त केला होता; ज्याच्या मदतीने ट्विशाने आपला जीव दिल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. परंतु शर्मा यांनी हा बेल्ट दोन दिवस स्वतःच्या खासगी वाहनात ठेवला आणि पहिल्या शवविच्छेदनाच्या वेळी तो जमा केला नाही. त्यामुळे पुरावा म्हणून त्याची विश्वासार्हता गंभीरपणे धोक्यात येऊ शकते. दुसऱ्या शवविच्छेदनाच्या वेळीही हा बेल्ट तिथे नव्हता, असे ट्विशाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे, आत्महत्या सिद्ध करण्यासाठी जो मुख्य पुरावा म्हणून सादर केला जात आहे, तोच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. असे आणखी अनेक प्रश्न आहेत. जर ट्विशाने आत्महत्या केली होती, तर तिचा नवरा फरार का झाला? त्याला कशाची भीती होती? घरात मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच गिरिबाला सिंह यांनी त्या सीसीटीव्ही विक्रेत्याला फोन का केला, ज्याने त्यांच्या घरात कॅमेरे बसवले होते? त्यांनी वकिलांची एक टीम त्या ब्यूटी पार्लरमध्ये का पाठवली- जिथे मृत्यूच्या दिवशी ट्विशाला पाहिले गेले होते. गिरिबाला यांना त्या फुटेजमध्ये इतका रस का होता? याचं कारण असं आहे का, की त्या फुटेजमध्ये ट्विशा अतिशय सामान्य आणि शांत वाटत होती; गिरिबाला यांनी स्वतःच्याच घरात पुराव्यांशी छेडछाड केली नसेल, यावर आपण कसा विश्वास ठेवायचा? कारण असे करण्यासाठी त्यांच्याकडे 10 दिवसांचा वेळ होता. आरोपपत्रात ट्विशाची अशी प्रतिमा उभी करण्यात आली आहे की, सासू आणि पतीच्या भावनिक छळामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त होती आणि तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. 12 मे रोजी मृत्यूच्या दिवशी ट्विशाने पाठवलेला शेवटचा व्हॉट्सॲप मेसेज अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्यात तिने तिची नणंद राशी अबरोल हिला सांगितले होते- ‘त्याला सांग की त्याच्या पत्नीचे उरलेले अवशेष घेऊन जा. पण उद्या. मला आता शांततेत मरू दे.’ मात्र, राशीने माझ्याशी बोलताना सांगितले की, हा मेसेज ट्विशाने पाठवला असेल यावर तिचा अजिबात विश्वास नाही. या मेसेजमुळे तिला धक्काच बसला होता; कारण ट्विशाने तिच्या आई-वडिलांच्या घरी परतण्याची पूर्ण तयारी केली होती. नोकरी मिळवण्यासाठी तिने आपल्या जुन्या मालकांशीही संपर्क साधला होता. त्याच संध्याकाळी ट्विशाने राशीला मेसेज करून सांगितले की, समर्थ ट्विशावर तिचे 20 लाख रुपये त्याला ट्रान्सफर करण्यासाठी दबावही टाकत होता. रात्री 10 वाजेनंतर- जेव्हा ट्विशाने शेवटचे तिच्या आईशी बोलणे केले- तेव्हाही तिने पुनरुच्चार केला होता की समर्थ खूप आक्रमक होत होता. त्यानंतर ती मृतावस्थेत आढळली. पहिल्या शवविच्छेदनात ट्विशाच्या शरीरावर मृत्यूआधी झालेल्या सात जखमांची नोंद करण्यात आली होती, ज्यात डोक्याला लागलेल्या माराचाही समावेश होता. मात्र, दुसऱ्या शवविच्छेदनात असा दावा करण्यात आला की वैद्यकीय-कायदेशीर महत्त्वाची कोणतीही जखम आढळली नाही. तर खुद्द सीबीआयच्या अहवालात समर्थ हिंसक वागणूक करत असल्याचा ट्विशाचा आरोप नोंदवलेला आहे. सीबीआयच्या अहवालात गिरिबाला यांच्या मोठ्या सुनेचाही छळ झाल्याचा उल्लेख आहे. अशा परिस्थितीत ट्विशाच्या कुटुंबीयांची हताशा समजून घेता येऊ शकते. सत्याच्या शोधासाठी आपणही त्यांच्या सुरात सूर मिसळून आणखी भेदक प्रश्न विचारले पाहिजेत.(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) पहिल्या शवविच्छेदनात ट्विशाच्या शरीरावर मृत्यूआधी डोक्याच्या मारासह सात जखमांची नोंद केली गेली होती. मात्र, दुसऱ्या शवविच्छेदनात वैद्यकीय-कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाची कोणतीही जखम आढळली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




