कोणत्याही संस्कृतीचे पालन, जतन आणि वहन ‘स्त्री’कडून जितके होते, तितके पुरूषाकडून क्वचितच होते. भारतासह जगभरातील अनेक संस्कृतींमधून ‘स्त्री’ला विविध देवता रूपांतून पूजले जाते. जननी, जन्मभूमी आणि जगदजननी म्हणजेच व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी अशा टप्प्यांमधल्या जगभरातील स्त्री देवी, तिची वेगवेगळी रूपे, त्या अनुषंगाने येणाऱ्या कथा आणि परंपरा यांबद्दल वाचकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे पुस्तक असे ‘जागर विश्वजननीचा’ या पुस्तकाचे स्वरूप आहे. प्रथमदर्शनी हे पुस्तक एखादा आध्यात्मिक, पौराणिक ग्रंथ असल्याचा भास होतो. पण तेवढ्यापुरतेच त्याचे महत्त्व मर्यादित नाही. ग्रीस, इटली, बॅबिलोन, आफ्रिकेतील देश, तिबेट, चीन, जपान, कोरियासह भारतातील विविध प्रदेशातल्या देवीरूपांचा सखोल आणि तौलनिक अभ्यास वाचकांपुढे मांडणारे हे पुस्तक आहे. म्हणूनच श्रद्धाळूंसाठी धार्मिक ग्रंथ आणि अभ्यासकांसाठी माहितीपूर्ण, मार्गदर्शक संदर्भग्रंथ असे ‘जो जे वांछील तो ते लाहो’ अशा पठडीतील हे पुस्तक आहे. सुरुवातीच्या प्रकरणांतून भारतातील शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर आदी पंथ, उपपंथांतील उपासनापद्धती, चालीरीती, राजकीय आक्रमणे, सामाजिक रचना व भौगोलिक परिस्थितीनुसार, कालपरत्वे त्यात होत गेलेले बदल यांची माहिती मिळते. एखाद्या गोष्टीत अनेक स्थित्यंतरे कशी होतात आणि विशिष्ट गोष्टीच्या मूळ रूपापेक्षा सद्य रूप तिला कसे मिळते, हे समजून घेण्यासाठी असे अभ्यासपूर्ण विवेचन उपयुक्त ठरते. राखेतून जिवंत होणारा ‘अमर’ पक्षी, देवी अदितीचे वाहन आहे, हे वाचताना फिनिक्स पक्ष्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मुळात ही गोष्ट आपल्याकडेही आहे, पण पहिल्यांदा वाचताना आठवतो तो ‘फिनिक्स’ पक्षी! यासाठीच ‘जागर’ महत्त्वाचा. तरीही ‘हे आधीच आमच्याकडे होते, बाकीच्यांनी आमच्याकडूनच हे उचलले आहे’ अशा प्रचारकी थाटाला हे पुस्तक पूर्णपणे फाटा देते. स्वतःच्या संस्कृतीची स्वत:शी नव्याने ओळख करून देताना ते जागतिक स्तरावरील ‘स्त्री’ संस्कृतीचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेते. मातृपूजन परंपरेचा इतिहास, वेद आणि उपनिषदांतील मातृशक्ती (उपनिषदे वेदांच्या शेवटी येत असल्याने उपनिषदांनाच ‘वेदांत’ म्हणतात), पुराणातील आदिशक्ती, ‘सप्तशती’तील नवदुर्गा, आरण्यकातील आदिमाता,(अरण्यात रचना झाली - ती आरण्यके), महाभारतातील देवी, भारतातील शक्तिउपासना आणि शाक्त या प्रकरणांतून भारतीय देवींच्या विविध अभिव्यक्ती वाचकांपुढे येतात. ती अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी सढळपणे संस्कृत श्लोकांची मराठी अन्वयार्थासह उद्धरणे वापरली आहेत. त्यातून अदिती, परांबिका, त्रिपुरसुंदरी, कन्याकुमारी, गायत्री, पद्मावती (आलुवेलूमंगम्मा), अन्नपूर्णा अशा अनेक देवींची महती कळते. भगवद्गीतेप्रमाणे ‘देवीगीता’ही आहे; त्यात नऊ अध्याय आणि चारशे श्लोक आहेत, यांसारखे ज्ञान पुस्तकातील पानापानंवर विखुरले आहे. ‘राष्ट्र’ हा शब्द कदाचित पहिल्यांदा देवीसूक्तात वापरला गेला असावा, त्याचा संदर्भ असणारा श्लोक या पुस्तकात आहे. दक्षिणमार्गी आणि वाममार्गी यांत नेमके अंतर, श्रौत व स्मार्त तंत्रातील फरक, विविध पंथांच्या तंत्रपद्धती, देवीची वाहने, श्रीयंत्र इत्यादींवरील संशोधनपर विवेचन वाचकाच्या ज्ञानकक्षा रूंदावते. सप्तमातृका, अष्टमातृका, चौसष्ठ योगिनी यांच्या सचित्र माहितीमुळे रोचकता वाढते. शाक्तपंथातील ‘मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन’ हे पाच ‘म’कार, तसेच ‘बलि’दानाची मीमांसा, त्यासंबंधीचे गैरसमज दूर करण्यास उपयुक्त ठरते. अर्धनारीनटेश्वर आणि नटराजाविषयीचे सविस्तर निरूपणही मनोवेधक आहे. बॅबिलॉनियन संस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय मातृदेवता ‘ईश्तर’. तिचे सीरियातील नाव ‘अस्टार्टे’, मोआनमधील ‘आश्तर’, अरबस्तानातील ‘आख्तर’ , ॲबिसिनियातील ‘आस्तर’ असा युरेशिया आणि आफ्रिका खंडातील पट लेखिका उलगडतात. दुसऱ्या उदाहरणात, जी भारतातील रती, ती इजिप्तमधील मिलित्ता, ग्रीसमध्ये ॲफ्रोडाइटी, रोममध्ये व्हीनस असते. आजच्या काळात ‘आयसिस’ हे देवीचे नाव आहे, हे वाचून थोडे आश्चर्य वाटेल, पण ते खरे आहे! ‘अनाहिता’ हे अगदी भारतीय वळणाचे नाव वाटत असले, तरी ती इराणी मातृदेवता आहे आणि या शब्दाचा अर्थ ‘निष्कलंक’ असा आहे, हा नाविन्यपूर्ण शोध या पुस्तकातूनच लागला. कालीमातेशी बरेचसे मिळतेजुळते दर्शन असणारी ॲझटेक देवी ‘कोएत्लिक्यू’ कुतूहल वाढवणारी आहे. कुनलून पर्वतावर निवास असल्यानेच चिनी आद्य देवीचे नाव ‘कुन’ आहे. ख्रिस्ती धर्मातील सेंट मेरी आणि मॅग्डालिन या संतपदी पोहोचलेल्या, परंतु देवीसमान उत्कट भक्तिभावाने आराधल्या गेलेल्या विभूतींची वर्णनेही अतिशय वाचनीय आहेत. इस्लामच्या उदयापूर्वी अरबस्तानात अनेकेश्वरवादी लोक राहत असत. अल् उज्झा, अल् लत आणि मन्नत या अरबस्तानातील स्त्री देवतांवर एक स्वतंत्र प्रकरण आहे. अशा प्रकारे ‘जागर विश्वजननीचा’तून देवीच्या ‘विश्वरूप दर्शनाचा’ योग घडतो. हे घडताना भारतासह जगभरातील विविध ठिकाणची रंगीत व कृष्णधवल छायाचित्रे, प्रतिमा, मूर्तींचे फोटो दिले असल्याने पुस्तकात जिवंतपणा आला आहे. त्यामुळे लिखित वर्णनाची समज वाढण्यास भरीव मदत होते. आई या शब्दाला बॅबिलोनियन भाषेत उम्मा, ॲकॅडियन भाषेत उम्मी व द्राविडी भाषांत अम्मा हा शब्द आहे. ‘उमा’ या मातृदेवतेची त्याच्याशी घातलेली सांगड विचार करायला भाग पाडते. तसेच काली, कराली, कात्यायनी, काममालिनी, दुर्गा, महानारायणी, कन्याकुमारी, महाशालिनी, सुभगा, गौरी अशा एका देवीच्या नामांतरांचे वर्णन करणाऱ्या श्लोकांचे रसग्रहण अप्रतिम आहे. यादृष्टीने विचार केल्यास शिल्पकला, मानववंशशास्त्र, भाषांच्या अभ्यासकांसाठीही हे पुस्तक उपयोगी ठरते. ‘जागर विश्वजननीचा’ पितृसत्ताक समाजात झालेली स्त्रियांची अवहेलना, स्त्रीमुक्तीचा विचार, या चळवळीतील विविध प्रवाह व मातृशक्तिपूजनाच्या आधुनिक कल्पनांना बगल न देता पुढे जाते, हे विशेष. पुस्तकाच्या संपादनावर आनंद हर्डीकर यांनी विशेष मेहनत घेतल्याचे जाणवते. या विषयावरचे अभ्यासपूर्ण पुस्तक वाचकांच्या हाती सुपूर्द करताना लेखिकेच्या लेखणीतून एकाच वेळी अभिमान आणि विनम्रता यांचे अनोखे मिश्रण पाझरते. बराचसा संशोधनपर आणि काहीसा मुक्तचिंतनपर असणारा हा ग्रंथ ‘आतां अभिनव वाग्विलासिनी। जे चातुर्यार्थ कलाकामिनी। ते श्रीशारदा विश्वमोहिनी। नमिली मियाँ’ या भावनेने त्यांनी सादर, सविनय विश्वजननीला अर्पण केला आहे. त्या विश्वजननीची छत्रछाया त्यांच्या लेखणीवाटे वाचकांना कायम लाभत राहो, ही प्रार्थना. पुस्तकाचे नाव - जागर विश्वजननीचा
लेखिका - डॅा. कल्याणी हर्डीकर
प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स
मूल्य - ₹ 395
पृष्ठसंख्या - 256 (लेखक प्रसिद्ध पचनसंस्था विकारतज्ज्ञ असून ते कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या (करामसाप) बेंगलोर विभागाचे उपाध्यक्ष आहेत.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




