पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कोणताही संकल्प करण्यापूर्वी‎ आधी मनावर नियंत्रण ठेवा

काही मोहिमांना अंतिम रेषा नसते. तिथे तुम्हाला धावावेही लागेल‎आणि वेळ आल्यावर उडीही मारावी लागेल. आजच्या काळात‎छोटी-मोठी कामे किंवा सामान्य यश फारसे महत्त्वाचे उरलेले नाही.‎नवीन पिढी काहीतरी वेगळे आणि अनोखे करण्यात पटाईत आहे.‎त्यांच्या तयारीत उत्साह आणि तत्परता नक्कीच आहे, पण‎संकल्पशक्तीची कमतरता आहे. या संकल्पशक्तीशिवाय ते अर्ध्या‎रस्त्यातच थकतात. कोणताही संकल्प संकल्प सात्त्विक असायला हवा. ‎अन्यथा तो हिंसेत रुपांतरित होऊ शकतो. संयम राखूनच संकल्प करा.‎संकल्प हा आत्मा, हृदय व बुद्धीचा विषय आहे. मन तर तो संकल्प‎मोडण्याचेच काम करते. तुम्ही सकाळी लवकर उठून फिरायला‎जाण्याचा संकल्प केला. अलार्म लावला. दोन मोबाईल आहेत, ते दोन्ही‎मोबाईलमध्ये अलार्म लावतात. पण सकाळी तो अलार्म वाजतो, तेव्हा‎तुमच्या आतून हात बाहेर काढून तो बंद करणारा आणि ‘आज नको,‎उद्यापासून जाऊया'' असे समजावणारा तो कोण असतो? हे काम‎मनाचेच असते.म्हणूनच संकल्प कराल, तेव्हा आधी मनावर नियंत्रण‎ठेवा. मग तुमचा संकल्प शंभर टक्के यशस्वी होईल.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *