
Pune Nagpur Vande Bharat Express Train : नागपूर आणि पुण्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि नागपूर या दोन शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत होती. रेल्वेकडून आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते पुणे या दोन शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस याच महिन्यात धावणार आहे. रेल्वे बोर्डामधील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरहून पुण्याला येण्यासाठी मोजक्याच ट्रेन उपलब्ध आहेत. त्याशिवाय रस्ते मार्गे अनावशक वेळ जातो. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, या मागणीने जोर धारला होता. नागपूरमधील अजनी येथून वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर पुणे आणि नागपूर या दोन शहरांमधील अंतरही खूप कमी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ वंदे भारत एक्सप्रेसमुळे जवळ येणार आहे. नागपूर (अजनी)- पुणे या मार्गावर वंदे भारत धावणार असल्याचे रेल्वे बोर्डाने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती रेल्वे बोर्डातील एका अधिकाऱ्याने दिली.
पुणे-नागपूर किती वेळ वाचणार?
पुणे ते नागपूर यादरम्यान सध्या रेल्वने १२ ते १३ तासांचे अंतर लागते. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास नागपूर ते पुणे फक्त १० तासांत पोहचणं शक्य होणार आहे. दोन ते अडीच तासांचा वेळ वाचणार आहे. पुणे आणि नागपूर या मार्गावर सध्या हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वांत जलद रेल्वे धावतेय. या ट्रेनला जवळपास १३ तास वेळ लागतो. वंदे भारतमुळे हा वेळ आणखी कमी होणार आहे.
कधी धावणार नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ?-
पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यात होणार आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी या मार्गावर वंदे भारत धावण्याची शक्यता हे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नागपूर (अजनी), बेळगाव-बंगळूर आणि कटरा-अमृतसर या तीन नवीन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ऑगस्ट महिनाच्या शेवटी अथवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळण्यासाठी रेल्वे बोर्डाने पीएम कार्यालयाशी संपर्क साधलाय.
कोण कोणत्या स्थानकावर थांबणार ?
दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा
Q
पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार आहे?
A
रिपोर्ट्सनुसार, नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यातच सुरू होण्याची शक्यता आहे.
Q
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे किती वेळ वाचवेल?
A
सुमारे २ ते अडीच तासांचा वेळ वाचणार आहे. सध्याचा १३ तासांचा प्रवास १० तासांमध्ये पूर्ण होईल.
Q
पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे कोणकोणत्या स्थानकांवर थांबे असतील?
A
दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
Q
नागपूर-पुणे वंदे भारत कोणत्या स्टेशनवरून सुरू होईल?
A
नागपूरजवळील अजनी स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सुरू होईल
Q
नागपूर-पुणे वंदे भारत या गाडीचे उद्घाटन कोण करणार आहे?
A
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
Q
पुणे ते नागपूर पर्यंतच्या वंदे भारतची संख्या किती आहे?
A
नागपूर-पुणे यादरम्यान दोन वंदे भारत धावण्याची शक्यता आहे. सकाळी वंदे भारत धावेल, तर सायंकाळी वंदे भारत स्लीपर धावण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या या मार्गावर एकही डायरेक्ट वंदे भारत एक्सप्रेस धावत नाही.
Q
नागपूरहून किती वंदे भारत एक्सप्रेस धावतात?
A
नागपूरहून सध्या ४ वंदे भारत एक्सप्रेस धावतात.
नागपूर - बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर - इंदूर वंदे भारत एक्सप्रेस
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




