जरा विचार करा, जर एखाद्या हत्तीने आपली सोंड तुमच्या गळ्याभोवती घट्ट गुंडाळली तर तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव कसे असतील? मग तो हत्ती कितीही लहान का असेना. जेव्हा मी असा एक फोटो पाहिला, ज्यामध्ये त्या हत्तीच्या पिल्लाने एका मच्छीमाराच्या गळ्याभोवती सोंड गुंडाळलेली होती, तेव्हा केवळ तो मच्छीमारच नव्हे, तर बोटीत त्या लहान हत्तीला धरून बसलेला दुसरा मच्छीमारही हसत होता. त्यांच्या हातात कोणतीही ट्रॉफी नव्हती, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. थोड्या वेळापूर्वीपर्यंत परिस्थिती अजिबात मजेशीर नव्हती. त्या 13 दिवसांच्या हत्तीच्या पिल्लाच्या सोंडेव्यतिरिक्त पाण्यावर दुसरे काहीही दिसत नव्हते. या आठवड्याच्या सुरुवातीला उत्तर बंगालमधील दुथडी भरून वाहणाऱ्या तिस्ता नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने ते पिल्लू आपल्या कळपापासून दुरावले होते. प्रवाहाने त्याला 4 किमी खाली आणले होते आणि ते पाण्यात पोहण्यासाठी धडपडत होते. जलपाईगुडीच्या 5 मच्छीमारांनी- बबलू दास, मिथुन दास, कादर दास, विश्वनाथ आणि गोपाल यांनी पाण्यावर आलेली त्याची छोटी सोंड पाहिली. ते किनाऱ्यावरून हतबल होऊन पाहत राहू शकले असते. मात्र त्याऐवजी त्यांनी आपली छोटी बोट वेगवान प्रवाहात उतरवली. ते हत्तीच्या जवळ पोहोचले आणि जेव्हा नदी त्याला वाहून नेण्यासाठी आतुर होती, तेव्हा त्यापैकी ३ मच्छीमारांनी वेगवान प्रवाहात उडी घेतली. त्यांनी घाबरलेल्या पिल्लाला ओढून अरुंद बोटीवर चढवले आणि मग त्याच्यासोबत पोहू लागले. नदीच्या प्रवाहाविरुद्ध ते बोट किनाऱ्याच्या दिशेने ढकलत राहिले. त्या दृश्याची कल्पना करा. 5 मच्छीमार, हत्तीचे एक छोटे पिल्लू, एक छोटी बोट आणि एक शक्तिशाली नदी, जी त्यांना वेगळे करण्यासाठी उतावीळ झाली होती. अखेर ते सुरक्षित स्थळी पोहोचले आणि पिल्लाला वनकर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले. त्याला काठाम्बारी रेंज ऑफिसमध्ये नेण्यात आले, जेथे त्याला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. मात्र पिल्लाला नदीतून वाचवणे हे फक्त अर्धे काम होते. त्याला त्याच्या आईपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. दीर्घकाळ मानवाच्या संपर्कात राहिल्यास हत्ती आपल्या पिल्लाचा स्वीकार करण्यास नकारही देऊ शकतात. गेल्या वर्षी उत्तर बंगालमध्ये आलेल्या पुरादरम्यान वाचवलेल्या एका पिल्लाला त्याच्या कळपाने स्वीकारले नव्हते. त्यामुळे वन अधिकारी, स्थानिक लोक आणि मच्छीमारांनी वेळेविरुद्ध आणखी एक धावपळ सुरू केली. सुमारे 2 तास त्यांनी कळपाचा शोध घेतला. अखेर वन विभागाचे पथक पिल्लाला बॅरेजच्या पलीकडे तिस्ता नदीच्या त्या कोरड्या भागापर्यंत घेऊन गेली, जिथे शक्यतो त्याच्या कळपाने आश्रय घेतला होता. त्यानंतर तो क्षण आला, ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती. आई आपल्या पिल्लाजवळ पोहोचली आणि तिने त्याचा स्वीकार केला. लवकरच ती आपल्या पिल्लाला दूध पाजताना दिसली. बचावकार्य पूर्ण झाले होते. पण कुठेतरी त्या फोटोंमध्ये आणखी एक कथा दडलेली आहे, जी लक्ष देण्याजोगी आहे. ही केवळ हत्तींची, नद्यांची किंवा मच्छीमारांची कथा नाही. ही कथा याबद्दल आहे की, चांगली कृती करणाऱ्या माणसावर त्याचा काय परिणाम होतो. पिल्लाकडे त्याला वाचवणाऱ्यांना देण्यासाठी पैसे नव्हते. ते धन्यवाद म्हणू शकत नव्हते आणि बबलू, मिथुन, कादर, विश्वनाथ आणि गोपाल कोण आहेत, हेही ते समजू शकत नव्हते. ते फक्त एवढेच करू शकत होते की, आपली सोंड एका मच्छीमाराच्या गळ्याभोवती गुंडाळू शकत होते. आणि तेवढे पुरेसे होते. हेच ते दिलासादायक हास्य होते, जे मच्छीमाराच्या चेहऱ्यावर उमटले होते. हा आनंद तेव्हा हळूच येतो, जेव्हा आपण एखाद्या गरजूला मदत करतो, एखाद्या अनोळखी व्यक्तीला दिलासा देतो किंवा एखाद्या दुसऱ्या माणसाचा कठीण दिवस थोडा सोपा करतो. कदाचित हे रेकॉर्ड करण्यासाठी कोणताही कॅमेरा नसेल. कुणीही टाळ्या वाजवणार नाही. कदाचित कुणाला समजणारही नाही. तरीही आपल्या आत काहीतरी हसत असते आणि कदाचित चांगुलपणाचे सर्वात सुंदर रहस्य हेच आहे की, जेव्हा आपण कुणाचे तरी आयुष्य सुखकर बनवतो, तेव्हा आपण बऱ्याचदा आपले मनही आनंदी करतो. कदाचित त्या हत्तीच्या पिल्लाने त्यांना मोबदल्यात काहीतरी दिले होते- आपण योग्य काम केल्याचे जाणून घेण्याचा कधीही न विसरता येणारा आनंद. सर्वात जास्त आनंद देणारा रिवॉर्ड कधीकधी तोच असतो, जो आपल्याला कुणीही देत नाही. फंडा असा आहे की, चांगल्या कामासाठी नेहमीच कोणत्याही रिवॉर्डची गरज नसते. जेव्हा आपण मदत करतो तेव्हा आतून निर्माण होणारा आनंद हा पैशाने विकत घेता येऊ शकणाऱ्या प्रत्येक गोष्टीपेक्षा मोठा असतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




