पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंबाबद्दलची आपुलकी‎ फुलांच्या सुगंधासारखी असते

प्रत्येक नावेला कुठेतरी छिद्र असतेच. एखादे छिद्र अचानक धोका‎निर्माण करते आणि नावेचे नुकसान होते. तर एखादे छिद्र फक्त‎नावालाच असते. नाव तशाही स्थितीत सुरक्षितपणे प्रवास करते.‎कुटुंबसुद्धा एका नावेसारखे आहे. ते या संसार सागरात राहते. या‎नावेला छिद्र आहे. या छिद्रातून आत पाणी येऊ लागते, तेव्हा समंजस‎नावाडी ते पाणी वेळेतच बाहेर उपसून टाकतो. कुटुंबातही भोग,‎विलास, वाईट गुणांचे पाणी त्या छिद्रातून आत येणारच. मुले भरकटू‎शकतात. किंबहुना मुले किंवा तरुणच कशाला, मोठी आणि वृद्ध‎माणसेही कधीकधी चांगला मार्ग सोडतात. अशा वेळी कुटुंबातील‎आनंद कसा टिकवून ठेवायचा? म्हणूनच, एका समंजस‎नावाड्यासारखे सावधगिरीने बोटीला वल्हवा. सतर्कता ठेवा. नावेतील‎अतिरिक्त पाणी लगेच बाहेर फेकून द्या. नाहीतर आयुष्यभर असेच‎वाटेल की नाव नदीत पोहत आहे. वास्तविक नदीच नावेत शिरेल. तेव्हा‎बुडणे अटळ होईल. म्हणूनच कुटुंबातील आनंद ,आपुलकी फुलाच्या‎सुगंधासारखी असते. ती डोळ्यांना दिसत तर नाही. पण जीवनाला एक‎सुंदर तृप्ती देऊन जाते.‎

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *