अंबरनाथमध्ये उपचारादरम्यान एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झालेल्या डॉ. स्वप्नाली गायकर यांनी शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक छळामुळे आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप डॉक्टर गायकर यांनी केला आहे. सध्या त्यांच्यावर उल्हासनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकी घटना काय?
अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या विजय विनोद जयस्वाल या ६ वर्षीय मुलाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता. डॉ. स्वप्नाली गायकर या त्याच्यावर उपचार करत होत्या. ७ फेब्रुवारी रोजी उपचारांदरम्यान त्या मुलाला सलाईन लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने सायन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र दुर्दैवाने तिथे त्याचा मृत्यू झाला. यानंतर मुलाच्या पालकांनी डॉ. गायकर यांच्यावर चुकीच्या उपचारांचा आणि हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला.
डॉक्टरांचा आरोप काय?
डॉ. स्वप्नाली गायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवाल (PM Report) येणे अद्याप बाकी आहे. असे असतानाही प्रवीण गोसावी, संदीप भरड, वैशाली नलावडे आणि मिलिंद मगर या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणतीही अधिकृत तक्रार नसताना त्यांना टार्गेट केले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आणि सातत्याने मानसिक दडपण आणून बदनामी केल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. याप्रकरणी कायदेशीर मार्गाने तपास व्हावा, पण अशा प्रकारे विनाकारण बदनामी करून मला आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे, असे डॉ. स्वप्नाली गायकर यांनी म्हटले.
तर दुसरीकडे, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवर आरोप झाले आहेत, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असून आपल्या चुकीच्या कामावर पडदा टाकण्यासाठी डॉक्टर ड्रामा करत आहेत, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. या मुलाच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असून आमची कायदेशीर लढाई सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या सर्व प्रकरणाची अंबरनाथ पोलीस चौकशी करत आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
[embedded content]
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




