तेव्हा प्रत्येक दिवस हिवाळ्यातील लख्ख ऊन पडलेल्या दिवसासारखा असायचा, ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपला सर्वोत्तम सूट किंवा ड्रेस घालून इतरांसमोर कॅटवॉक करते, जेणेकरून ती त्यांच्या नजरेत भरू शकेल. मी खऱ्या हवामानाबद्दल बोलत नाहीये, तर या भावनेची तुलना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपशी करत आहे. कारण गेल्या 4 वर्षांपासून हा ग्रुप नेहमी नाइट-आऊट प्लॅन, डेटिंग ॲपचे स्क्रीनशॉट्स, गप्पागोष्टी आणि त्या वीकेंडला कोण काय घालणार आहे याच्या फोटोंनी भरलेला असायचा. मग जेव्हा पासआऊट होण्याचे आणि पदवीदान समारंभाचे फोटो पोस्ट होऊ लागले तेव्हा हवामान बदलले. स्क्रीन ढगाळ दिसू लागली. कारण नोकरी देणाऱ्या कंपन्यांचे रिजेक्शन लेटर आपला विद्रूप चेहरा दाखवू लागले होते. ती सर्व एकाच ओळीने सुरू व्हायची- ‘डिअर रमेश/सुरेश/महेश’. फक्त उमेदवारानुसार त्याचे नाव बदलायचे आणि बाकीच्या ओळी तशाच राहायच्या. पुढच्या ओळीत असायचे- ‘अर्ज करण्यासाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद, पण उमेदवारांच्या मोठ्या संख्येमुळे आम्ही सध्या तुम्हाला वैयक्तिक फीडबॅकही देऊ शकत नाही. इतर करिअरच्या संधींसाठी आमची वेबसाइट किंवा जॉब साइट्स पाहत राहा...’ गेल्या 1 महिन्यात ग्रुपमध्ये त्या ओळींच्या पुढे कोणी वाचलेच नाही. गेल्या 2 दिवसांपासून तर काही लोक स्माइली पाठवू लागले आहेत. कारण त्यांना स्पष्टपणे माहीत आहे की दुसरा कोणताही सल्ला नैराश्य आणणाराच असेल. त्यांच्याकडे पदव्या आहेत, कॉलेजच्या 4 वर्षांची अनेक प्रमाणपत्रे आहेत, इंटर्नशिप लेटर आहेत आणि काहींकडे तर कामाचा अनुभवसुद्धा आहे. पण ज्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी ही सगळी प्रमाणपत्रे होती, तीच एक गोष्ट बहुतेकांकडे नव्हती : एक जॉब. जॉब रिजेक्शनच्या धक्क्यातून सावरण्यासाठी काही स्ट्रॅटेजी येथे दिल्या आहेत. 1. आपली किंमत कोणाच्याही निर्णयापासून वेगळी ठेवा : रिजेक्शन हा एखाद्या कंपनीचा व्यावसायिक निर्णय होता, हे तुमच्या मानवी मूल्याचे प्रतिबिंब नाही.
2. अशी पत्रे इनबॉक्समध्ये येताच स्वतःला वेंटिंग टाइम द्या : निराश वाटत असल्यास 15 मिनिटांचा टायमर लावा, एखाद्या मित्राजवळ भडास काढा किंवा तुमची निराशा लिहून काढा आणि मग पुढे जा.
3. कनेक्टेड राहा : जरी त्यांनी तुम्हाला नम्रपणे फीडबॅक न मागण्यास सांगितले असले तरीही नम्रपणे त्यांना वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सांगा आणि विचारा की असे कोणते क्षेत्र आहे का, ज्यामध्ये तुम्ही फिट होऊ शकता. तुमची वैशिष्ट्ये सांगा. शक्य आहे की, सततच्या प्रयत्नांमुळे तुम्ही ‘कन्विन्सिंगशी संबंधित जॉब’पर्यंत पोहोचू शकाल.
4. जॉब हंटिंग एका नंबर गेमसारखे आहे : तुमच्या बाजूने ॲप्लिकेशन पाइपलाइन इतकी व्यस्त असली पाहिजे की, एका रिजेक्शनमुळे तुम्हाला जग संपल्यासारखे वाटू नये.
5. पॉझिटिव्ह ग्रुपचा भाग बना : रिजेक्शन वेळेसोबत तुमचा आत्मविश्वास कमी करते. तुमचे पालक आणि जवळच्या लोकांना सांगा की त्यांनी तुमची पॉझिटिव्ह स्तुती करून तुम्हाला सपोर्ट करावा. दररोज नवीन लोकांना भेटा आणि तुम्हाला त्यांच्याकडे आकर्षित करणारी वैशिष्ट्ये शोधा. थोडक्यात, निरीक्षण कौशल्य विकसित करा. 6. ॲक्शन अँग्झायटी दूर करते : तुम्ही कुठे अडकत आहात ते पाहा. तुम्ही अर्ज केल्यानंतर लगेचच रिजेक्ट होत असाल तर रेझ्युमे ठीक करा. जर इंटरव्ह्यूच्या नंतर रिजेक्ट होत असाल तर संभाषण कौशल्यावर काम करा. 7. कम्प्लिट डिजिटल ब्रेक घ्या : सतत येणारे नोटिफिकेशन्स तुमच्या मज्जासंस्थेला तणावात ठेवतात. ई-मेल चेक करण्यासाठी सक्तीने वेळ ठरवा आणि लोकांना समोरासमोर भेटून नेटवर्किंग वाढवा.
जेव्हा तुम्ही मेंटॉर किंवा पालकांनी सुचवलेल्या या आणि इतर काही स्ट्रॅटेजी वापराल तेव्हा तुमची सोशल लाइफ बदलेल. तुमचे प्राधान्यक्रम आणि फोकस बदलेल आणि मोटिव्हेशनसाठी तुम्ही बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा प्रसिद्ध डायलॉग लक्षात ठेवू शकता- ‘किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.’ फंडा हा आहे की, जेव्हा जॉब रिजेक्शनचे क्रूर वास्तव तुमच्यासमोर येईल तेव्हा स्वतःला सांगा की तुमच्याकडे ‘जॉब हंटिंग’चा एक महत्त्वाचा जॉब आहे आणि त्याच प्रोजेक्टवर फोकस ठेवा. खात्री बाळगा, ‘शिद्दत’ने केलेला फोकस तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन जाईल.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



