हे एक विचित्र आंदोलन होते. पोलंडमधील वॉर्सा येथे ‘डिजिटल अफेअर्स’ मंत्रालयाच्या कार्यालयासमोर सोमवारी 30 आंदोलक जमले होते. त्यांनी केवळ पोलंडलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला थक्क करून सोडले. या आंदोलकांनी पोलंडचे डिजिटल कार्यमंत्री क्रिस्तोफ गोव्हकोवस्की यांना कार्यालयाबाहेर येऊन बोलण्यास भाग पाडले. ते एआयवर नियंत्रणाची मागणी करत होते. लक्षात ठेवा. आंदोलकांची संख्या फक्त 30 होती. ही लहान संख्या अचंबित का करते? कारण ती माणसे नव्हती, तर रोबोट होते! गोव्हकोवस्की यांनीही त्यांच्या मागणीशी सहमती दर्शवली. ते म्हणाले, “ह्युमनॉइड्समध्ये वापरलेले असे अनियंत्रित एआय मॉडेल्स, ते रोबोटायझेशनसोबत सतत विकसित होत राहतील ही एक मोठी समस्या आहे.’ या घटनेमुळे मला गेल्या महिन्यात एका ज्युनियर वकिलासोबत झालेली भेट आठवली. तो खूप निवांत दिसत होता. हातात कोणतीही कागदपत्रे न घेता तो ऑडिटोरियममध्ये संगीताचा आनंद घेत होता. मी त्याला म्हणालो, “तुम्ही तर ‘सूट्स’ या गाजलेल्या लीगल ड्रामा सिरीजमधील स्टायलिश वकील हार्वीसारखे दिसत आहात.’ तो हसला आणि म्हणाला, “एआयचे आभार. त्याने माझ्यासारख्या वकिलांचे रूपच बदलून टाकले आहे. आता आम्हाला कागदपत्रांचे ढीग सोबत घेऊन फिरण्याची किंवा रात्रभर घरात बसून ती चाळण्याची गरज पडत नाही.’ त्यानंतर आमच्यात एआय टूल्स काम कसे सोपे करत आहेत यावर चर्चा सुरू झाली. एआय नोकऱ्या हिरावून घेण्याऐवजी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवत आहे यावर आम्हा दोघांचेही एकमत होते. पुढे काय करायचे हे ठरवण्यासाठी करारातील 100 कलमे वाचत बसण्यापेक्षा एआय काही सेकंदात ती स्कॅन करून उत्तर देऊ शकतो. यामुळे वकिलांना सखोल विचारासाठी जास्त वेळ मिळतो. पण त्याने याच्या एका तोट्याकडेही माझे लक्ष वेधले. काही लॉ फर्म्सनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये एआयमुळे चुकीची माहिती गेली आणि त्यामुळे त्यांना न्यायालयात नामुष्की सहन करावी लागली, अशी काही उदाहरणे त्याने सांगितली. त्याचे म्हणणे अगदी बरोबर होते. एआयच्या अथांग क्षमतेचा वापर करून व्यावसायिक आयुष्यात बदल घडवून आणणे ही केवळ कर्मचारी आणि त्यांच्या वरिष्ठांसमोरचीच आव्हानात्मक बाब नाही, तर ती प्रत्येक मालकासमोरील एक मोठे आव्हान आहे. जनरेटिव्ह एआयच्या मदतीने ज्युनियर्स पॉवरपॉइंट सादरीकरणे पटकन तयार करू शकतात. परंतु त्यांच्या बॉसला त्यातील तथ्यांची तपासणी करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागू शकतो. कार्यालयांमध्ये अशीही उदाहरणे घडली आहेत. तेथे चुकीची माहिती देणाऱ्या एआय बॉटमुळे कर्मचारी इतके वैतागले की, त्यांनी संतापाच्या भरात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना ‘मानसिकदृष्ट्या अस्थिर’ ठरवले गेले. त्यामुळे खरे आव्हान हे नाही की आपण एआयचा वापर करावा की नाही, तर खरे आव्हान हे आहे की आपण आपले किती काम त्याच्याकडे सोपवायचे. आपली जबाबदारी यंत्रावर सोपवू नका. एआय सादरीकरण तयार करू शकतो, पण कर्मचाऱ्याने प्रत्येक आकडेवारीची खात्री करून घेतली पाहिजे. तो एखाद्या कराराचा सारांश देऊ शकतो. पण वकिलाने महत्त्वाचे नियम स्वतःच वाचले पाहिजेत. एआय अहवाल तयार करू शकतो, पण सही करणाऱ्या व्यक्तीने सर्व तथ्ये अचूक असल्याची खात्री केली पाहिजे. तो उत्तरे सुचवू शकतो, पण माणसाने स्वतःला विचारले पाहिजे की, ‘हे योग्य वाटते का? यात काही राहून तर गेले नाही? काही चुकेल का?’ एआय उपलब्ध आहे म्हणून कोणीही त्याचा वापर करू नये. भविष्यातील कामाचे ठिकाण कदाचित एआय वापरणारे आणि न वापरणारे अशा दोन भागांत विभागले जाणार नाही, तर ते एआयचा समंजसपणे वापर करणारे आणि विचार करण्याचे कामच एआयवर सोडणारे, अशा दोन वर्गांत विभागले जातील. वॉर्सा येथील रोबोट कदाचित हीच मागणी करत होते की माणसाने ‘आपल्या कामाच्या जागेचे रक्षण करावे.’ पण माणसांना नोकरीपेक्षाही मौल्यवान असलेल्या एका गोष्टीचे रक्षण करण्याची गरज आहे—ती म्हणजे विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतः जबाबदारी घेण्याची आपली क्षमता. फंडा असा की - थोडक्यात काय तर, भविष्यात यंत्रासोबत मिळून काम करणाऱ्यांची किंमत वाढेल, स्वतःच यंत्र बनणाऱ्यांची नाही!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नंदनवन लॉन्समध्ये ‘शिवाजी महाराज चरित्र कथा’ला प्रारंभ! 🚩🙏
DSP चौकात वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई! 🚔⚠️
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपी CCTV कॅमेऱ्यात कैद! 📹⚠️
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




