पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:योग कराल तर सौंदर्य असो‎ वा नसो, तेज नक्कीच असेल

सौंदर्य आणि कुरूपतेच्या बाबतीत आपण फक्त शरीरावरच अडकून‎राहतो. कोण सुंदर व कोण कुरूप, हे माणसाच्या शरीराबाबत आपणच‎दिलेले प्रमाणपत्र आहे. आपण फक्त शरीराचाच विचार करतो,‎म्हणूनच एका ठिकाणचे सौंदर्य दुसऱ्या ठिकाणी कुरूपता बनते. गोरी‎त्वचा आणि काळी त्वचा हा तर सौंदर्याचा मोठा मापदंड बनला आहे.‎संपूर्ण आयुष्य यातच निघून जाते. खूप कमी लोकांना हे समजते की,‎एक जन्मजात सौंदर्यही असते आणि ते आत्म्याचे असते. आज सर्वच‎जण ऑटोमेशनकडे जात आहेत. सर्वांचा कल बाह्य जगाकडेच आहे.‎मशीन माणसाला सुंदरही बनवत आहे आणि कुरूपही. पण आत्म्याचे‎सौंदर्य ओळखलेल्यांच्या शरीरातून एक वेगळीच गोष्ट प्रकट झाली.‎तिलाच ‘तेज'' म्हणतात. हे तेज सौंदर्य आणि कुरूपता या दोघांपेक्षा‎वेगळे आहे, किंबहुना श्रेष्ठ आहे. आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग हे‎एक साधन आहे. योग केल्यास त्याच्याकडे सौंदर्य असो वा कुरूपता,‎पण त्याचे तेज कायम राहील. याचे मोठे उदाहरण अष्टावक्र आहेत.‎त्यांना कुरूपतेचे प्रतीक मानले गेले. पण त्यांच्या तेजासमोर सर्व काही‎फिके पडले होते.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *