माणसाच्या आयुष्यात नेहमी चढउतार येतात. कधी सुखाचे क्षण असतात तर कधी दु:खाचे क्षण असतात. त्या काळात तुम्ही कसे वागता? ती परिस्थिती कशी हाताळता यावर सर्व काही अवलंबून असतं. महाराष्ट्रातही अशाच दोन घटना घडल्या आहेत. राज्यात सध्या इयत्ता बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थीनीला वर्गातच चक्कर आली. तिला लगेच रुग्णालयात अॅडमिट केलं. तिच्यावर उपचार सुरू केले. बरं वाटायला लागल्यावर तिने रुग्णालयात बसून पेपर सोडवला. दुसरी घटना तर अत्यंत हृदयद्रावक आहे. वाचून कुणाच्याही मनात कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही. काय आहे ही घटना?
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान एक धक्कादायक पण तितकीच दिलासादायक घटना समोर आली आहे. हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि च्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या अमरावती विभागीय मंडळांतर्गत सुरू असलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीची अचानक प्रकृती बिघडली होती. 21 फेब्रुवारी रोजी गणिताची परीक्षा सुरू असताना मूर्तीजापूर तालुक्यातील हरिपूर येथील अनंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज येथील श्रेया गुणवंत देशमुख हिची सकाळी सुमारे 10:50 वाजता प्रकृती अचानक खालावली आणि चक्कर येऊन ती बेशुद्ध पडल्याने परीक्षा केंद्रातील कर्मचारी आणि उपस्थित पालकांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या घटनेची माहिती केंद्र संचालकांनी तत्काळ वरिष्ठांना कळवली.
विभागीय अध्यक्ष संदीप सांगवे यांनी तातडीने मार्गदर्शन करत त्यानुसार सकाळी 11:40 वाजता संबंधित अधिकाऱ्यांनी महाजन रुग्णालयात भेट देत विद्यार्थिनीच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर विद्यार्थिनीने परीक्षा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर मूर्तीजापूर येथून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका रुग्णालयात पोहोचवण्यात आली. शिक्षकांच्या उपस्थितीत आणि नियमांचे पालन करत विद्यार्थिनीने रुग्णालयातच गणिताचा पेपर पूर्ण केला.
घरी आईचे पार्थिव… आणि…
दुसरी घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. भंडारा येथील विद्यार्थ्याची आई अनेक दिवसापासून दुर्धन आजाराने आजारी होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या आदल्याच रात्री काळाने सुखरामची परीक्षा घेतली. त्याच्या आईचा मृत्यू झाला. परीक्षेच्या तणावात आई पाठराखण करत असते. मात्र आता त्या आईचेच छत्र हरपल्याने विद्यार्थ्याचे अश्रू अनावर झाले. मात्र आईचे स्वप्न पूर्व करावे या उद्देशातून सुखराम निदराम भुसारी या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याने स्वतःला सावरले आणि धैर्य दाखवत करिअरमधील पहिला पेपर दिला. सुखराम निदराम भुसारी असे विद्यार्थ्याचे नाव असून तो भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल पालांदूर येथील विद्यार्थी आहे. आईचे छत्र हरवून गेल्याने विद्यार्थ्याने धैर्य न सोडता शुक्रवारी जड अंतःकरणाने मराठीचा पेपर दिला. विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक केले जात असून शिक्षणप्रती असलेली तडमड दाखविली आहे.
पेपरफुटीप्रकरणी दोघांना अटक
दरम्यान, नागपुरात बारावी पेपरफुटी प्रकरणी ट्युशन संचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. निशिकांत मून (मानकापूर) फरहान अख्तर (कामगारनगर) अशी त्यांची नावे आहेत. निशिकांत मून हा शिकवणी वर्ग चालवत होता, तर फरहान हा तिथे शिक्षक म्हणून काम करत होता. सिव्हिल लाइन्स येथील सेंट उर्मूला हायस्कूल परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. रसायनशास्त्राच्या पेपरदरम्यान विद्यार्थिनीच्या झडतीत स्मार्टफोन सापडला. व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरे अपलोड होत होती. ‘एक्सआयआय’ नावाच्या 21 सदस्यीय ग्रुपवर पेपर फोडण्यात करण्यात आला होता. मोबाईलमध्ये 16 फेब्रुवारीचा भौतिकशास्त्र पेपरही या ग्रुपवर आढळला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक तपासातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




