आपण मान्य केले किंवा नाही, तरी जग सध्या एकाविशिष्ट परिवर्तनातून जात आहे. औद्योगिक क्रांतीनंतरएवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा हा बदल असून तो दोनशतकांऐवजी अवघ्या दोन दशकांत पूर्ण होण्याचीशक्यता आहे. स्टॅनफर्ड एआय इंडेक्सनुसार,जीपीटी-3.5 दर्जाच्या मॉडेलला प्रश्न विचारण्याचा खर्च2022 मध्ये दहा लाख टोकन्समागे 20 डॉलर होता. 2024मध्ये तो केवळ 0.07 डॉलरवर आला. ‘एसडब्ल्यूई-बेंच'' या सॉफ्टवेअर अभियांत्रिकी क्षमतेचेमूल्यमापन करणाऱ्या निकषावर एआय प्रणालींचीकामगिरीही मोठ्या प्रमाणात सुधारली. 2023 मध्ये ही प्रणाली केवळ 4.4 टक्के समस्या सोडवत होती.. 2024 मध्ये हा आकडा 71.7 टक्क्यांवर पोहोचला.मॅककिन्सेच्या सर्वेक्षणानुसार 2025 पर्यंत 88 टक्केसंस्थांनी किमान एका व्यावसायिक कामात एआयचावापर सुरू केला आहे. दोन वर्षांपूर्वी हे प्रमाण 55 टक्केहोते. जनरेटिव्ह एआय केवळ तीन वर्षांत जगातील 53 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचले आहे. बुद्धिमत्ता आज पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त, सहज उपलब्ध व व्यापक वापरासाठी सक्षम झाली आहे. त्यामुळे प्रत्येक सरकार, उद्योग , संस्थेला आपल्या धोरणांचा फेरविचार करावा लागेल. भारतासमोरचा खरा प्रश्न असा आहे की, याबदलातून आपण किती मूल्यनिर्मिती करू शकतो? सध्या भारत जागतिक एआय प्रणालींना डिजिटलमाहिती, भाषिक विविधता आणि मानवी संदर्भ पुरवत आहे. मात्र, अत्याधुनिक एआय मॉडेल्सची निर्मितीअजूनही मुख्यतः इतर देशांमध्ये होत आहे. स्टॅनफर्डच्या अहवालानुसार, 2024 मध्ये जगातील 90 टक्केआघाडीची एआय मॉडेल्स अमेरिकेत विकसित झाली.म्हणजेच, भारत भविष्यातील बुद्धिमान प्रणालींनाप्रशिक्षण देत असला, तरी स्वतःची संगणकीय क्षमता,डेटा संरचना आणि मॉडेल विकास पुरेशा प्रमाणातनसल्याने त्यातील मोठा आर्थिक लाभ परदेशात जातआहे. भारताची सुरुवात कमकुवत नाही. उलट जगातीलमोजक्याच देशांकडील चार महत्त्वाची बलस्थानेभारताकडे आहेत— प्रतिभा, धोरणात्मक मोकळेपणा,पायाभूत सुविधा आणि ऊर्जा. एआय कौशल्याच्याबाबतीत भारत जगात अव्वल आहे. देश आता केवळअभियंते निर्यात करणारा राहिलेला नाही. ग्लोबलकॅपेबिलिटी सेंटर्स, स्टार्टअप्स आणि मोठ्या कंपन्यादेशातच एआय संशोधन आणि विकासासाठी स्वतंत्रपथके उभारत आहेत. त्यामुळे भारत एआय युगातीलकेवळ ''बॅक-ऑफिस'' न राहता प्रमुख संचालन केंद्रबनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुसरे बलस्थानम्हणजे भारताचे संतुलित नियामक धोरण. भारतीयरिझर्व्ह बँकेचे ‘रेग्युलेटरी सँडबॉक्स'', इंटरनॅशनलफायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर प्राधिकरणाची(आयएफएससीए) नवोन्मेष चौकट आणिइंडिया-एआय मिशनची तत्त्वाधारित मार्गदर्शक तत्त्वेयामागील भूमिका स्पष्ट आहे— प्रथम नवकल्पनाविकसित होऊ द्या, त्यानंतर आवश्यक ते नियमन करा. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय कठोरनियमांमुळे नवकल्पनांना अडथळा निर्माण होऊ शकतो.त्यामुळे भारताची ही भूमिका भविष्यात स्पर्धात्मक लाभदेऊ शकते. तिसरे बलस्थान म्हणजे वेगाने उभारलीजाणारी पायाभूत सुविधा. डेटा सेंटर, सेमिकंडक्टर,क्लाउड क्षमता आणि उच्च कार्यक्षम संगणकीय सुविधाया क्षेत्रांत भारत मोठी झेप घेत आहे. केवळ डेटा सेंटरक्षेत्रातच 70 अब्ज डॉलरची गुंतवणूक सुरू असून,आणखी 90 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणाझाली आहे. विशाखापट्टणममध्ये गूगलचा 15 अब्जडॉलरचा एआय हब, मायक्रोसॉफ्टची क्लाउड आणिएआयसाठी 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणिजामनगरमध्ये रिलायन्सचा बहुगिगावॅट डेटा सेंटर प्रकल्पहे भारताच्या वाढत्या महत्त्वाचे द्योतक आहेत. चौथे आणि तितकेच महत्त्वाचे बलस्थान म्हणजे ऊर्जा.डेटा सेंटरला अखंड आणि विश्वासार्ह वीजपुरवठ्याचीगरज असते. 2025-26 मध्ये भारताने विक्रमी 55.3गिगावॅट अतिरिक्त जीवाश्ममुक्त ऊर्जा क्षमता निर्माणकेली आहे. गेल्या दशकात सौरऊर्जेची किंमतही मोठ्याप्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे स्वच्छ ऊर्जेच्याआधारे एआय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भारतजगातील महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक बनत आहे. ( हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)कौशल्याची पातळी जागतिकसरासरीपेक्षा 2.8 पट अधिक आहे. याबाबतीत भारत अमेरिका व जर्मनीलाहीमागे टाकत आहे. गेल्या दशकातभारतातील एआय कौशल्यात झपाट्यानेवाढ झाली. त्याचा देशांतर्गत वापर केलाजात आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



