Priyanka Chopra : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी आपल्या खास दिवसाच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या. मात्र ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा हिने यंदा चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलं. तिने आपल्या लग्नाचा एक कधीही न पाहिलेला व्हिडिओ शेअर करत पती निक जोनसला ‘माझा फॉरएव्हर व्हॅलेंटाइन’ असं संबोधलं.
इन्स्टाग्रामवर रोमँटिक कॅप्शनसह अभिनेत्री प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रियंका आणि निक यांच्या लग्नातील सुंदर क्षण पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या विवाहसोहळ्याची झलक दिसते आहे. प्रियंका एका बाजूला पांढऱ्या गाऊनमध्ये तर दुसऱ्या बाजूला पारंपरिक लाल लेहंग्यात अत्यंत देखणी दिसत आहे. निक जोनसही भावुक झाल्याचे क्षण या व्हिडिओमध्ये टिपले गेले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव केला आहे.
2018 मधील शाही विवाह
डिसेंबर 2018 मध्ये प्रियंका चोप्राने निक जोनससोबत लग्नगाठ बांधली. दोघांनी हिंदू तसेच पाश्चात्य पद्धतीने विवाह केला होता. त्यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा देश-विदेशात झाली होती. या दाम्पत्याला ‘मालती मेरी चोप्रा जोनस’ नावाची मुलगी आहे. तिचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. अनेकदा प्रियंका आणि निक आपल्या लेकीसोबतचे गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
कामाच्या बाबतीतही प्रियंका सध्या खूप व्यस्त आहे. तिच्या आगामी ‘वाराणसी’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट एस एस राजामौली दिग्दर्शित करत आहेत. ज्यांनी RRR आणि बाहुबली सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, 25 फेब्रुवारी रोजी प्रियंका चोप्राचा The Bluff हा प्रकल्प ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने शेअर केलेल्या या खास व्हिडिओमुळे प्रियंका आणि निकच्या प्रेमकहाणीची पुन्हा एकदा चर्चा रंगली असून चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
शहर
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
महाराष्ट्र
- कोल्हापूर: बीआयआर कायद्याचा अध्यादेश मागे घ्या! कोल्हापुरात हजारो साखर कामगारांचा विराट मोर्चा; २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
- सोलापूर: १६ वर्षांचा संसार मोडल्याने पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले चक्क गाढविणीशी लग्न
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
























Subscribe to my channel



