संसदेत कायद्यातील बदलानंतर आता युपीआयच्यामोठ्या व्यवहारांवर एमडीआर शुल्क आकारण्याचामार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेचा दबाव झुगारूनदेत सरकारने स्पष्ट केले की, सायबर सुरक्षा व डिजिटलपायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मोठ्याव्यापाऱ्यांकडून शुल्क आकारणे गरजेचे आहे. डिजिटल पेमेंटसाठी संसदेत 2007 मध्ये कायदा केलाहोता. त्यानुसार 2008 मध्ये ‘एनपीसीआय''ची स्थापना झाली. पुढे 2016 मध्ये नोटाबंदीच्या काही महिन्यांपूर्वी युपीआयची सुरुवात झाली. गेल्या 10 वर्षांत युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या 12 हजार पटींनी वाढली. रिअल टाईम पेमेंटमध्ये जगभरात 49 टक्के वाटाएकट्या भारताचा आहे. आज 12 पेक्षा जास्त देशांत युपीआयचा तिरंगा फडकत आहे. पण 55.49 कोटी भारतीयांना मोफत मिळणाऱ्या या युपीआयमुळेकमकुवत होणाऱ्या बँका व परदेशी कंपन्यांना मिळणारा नफ्यासंबंधी 4 महत्त्वाच्या बाबी समजून घेऊ या. 1. रिझर्व्ह बँकेच्या 6 एप्रिल 2018 च्या आदेशानुसारसर्व्हिस प्रोव्हायडर्स, मध्यस्थ संस्था, थर्ड पार्टी वेंडर्स वइतरांना डिजिटल पेमेंटशी संबंधित सर्व डेटा फक्तभारतातच साठवणे बंधनकारक होते. मात्र 2020 मध्येदिल्ली हायकोर्टात ‘गूगल-पे''ने म्हटले की, ते ग्राहकांचीनावे, पत्ते, ईमेल व व्यवहारांची माहिती समूहातील वबाहेरील कंपन्यांशी सामायिक करतात. युपीआयमधीलप्रभाव वाढवण्यासाठी व्हॉट्सॲपच्या गुंतवणुकीमुळे 17लाख मासिक युजर्स असलेल्या ‘क्रेड'' कंपनीचे मूल्य43,239 कोटी रुपये झाले आहे. युपीआयशी जोडलेल्याइतर कंपन्याही भारतीयांच्या वैयक्तिक व बँकिंग डेटाच्याव्यापारातून अब्जावधी डॉलरचा नफा कमावला
2. एनपीसीआयने नोव्हेंबर 2020 मध्ये एक आदेशकाढला होता. त्यानुसार युपीआयमध्ये एका कंपनीचावाटा 30 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. यानियमाच्या अंमलबजावणीची मुदत तीन वेळा वाढवलीअसून ती या वर्षी डिसेंबरमध्ये संपत आहे. 2016 मध्ये‘भीम'' (BHIM) ॲपचा मोठा गाजावाजा झाला होता.पण आज त्याचा वाटा केवळ 0.86 टक्के उरला आहे.दुसरीकडे, अमेरिकेच्या वॉलमार्टच्या मालकीच्या‘फोन-पे''कडे 47 टक्के व ‘गूगल-पे''कडे 37 टक्केवाटा आहे. या दोन अमेरिकन कंपन्यांकडेच युपीआयचा84 टक्के वाटा असण्याबाबत संसदीय समितीने 2024मध्ये चिंता व्यक्त केली होती.
3. पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाने मे 2023 मध्येएमडीआर लागू करण्याची मागणी केली होती. ट्रम्पयांच्या दबावामुळे लागू होत असलेल्या एमडीआरमुळेभारताचे ‘रुपे कार्ड'' कमकुवत होईल व अमेरिकेच्या‘व्हिसा'' व ‘मास्टर कार्ड''चा व्यवसाय वाढेल. नीटपरीक्षेचे आयोजन करणाऱ्या ‘एनटीए''प्रमाणेचएनपीसीआयसुद्धा संस्थात्मक कमकुवतपणा,आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीची शिकार झाली.जगातील 49 टक्के रिअल टाईम पेमेंटवर नियंत्रणठेवणारी एनपीसीआय स्वतःला माहिती अधिकारव‘राज्य'' या व्याख्येच्या कचाट्यातून बाहेर मानते.कायद्यातील बदलानंतर आता शुल्काचे दर आणिएमडीआर लागू करण्याचा निर्णय एनपीसीआयच घेईल.
4. मायक्रोसॉफ्ट,ओपन-एआयच्या ‘चॅट-जीपीटी''मुळेयुपीआयमध्ये एआयचा वापर सुरू झाला आहे. युपीआयव्यवहारांचा इतिहास, विजेचे बिल, खर्च, बचतीचेस्वरूप या माहितीच्या बळावर क्विक कॉमर्स, फिनटेक,गेमिंग, विमा आणि कर्जाशी संबंधित स्टार्ट-अप्समालामाल होत आहेत. अमेरिकेच्या ‘ॲन्थ्रोपिक''कंपनीच्या ‘क्लॉड मिथॉस''सारखा धोकाही भारतीयबँकांना आहे. स्टेट बँक व इतर बँकांना या युपीआयक्रांतीचा फायदा का मिळाला नाही, यावर देशहितासाठीविचारमंथन होणे गरजेचे आहे.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भीम ॲपचा एकूण वाटा अवघा 0.86टक्के आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्यावॉलमार्टच्या मालकीच्या फोन-पेकडे47 टक्के व गूगल-पेकडे 37 टक्के वाटाआहे. दोन अमेरिकन कंपन्यांकडेयूपीआयची 84 टक्के हिस्सेदारी असणेही चिंतेची बाब असली पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
महाराष्ट्र
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
- ठाणे: कोपरी पोलीस ठाण्यातच महिलांनी युट्युब भाई सिद्धू अभंगेला धुतले; पोलिसांसमोरच घडला राडा
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

रस्ता रुंदीकरणावरून शाही मशिदीवर कारवाई; विरोधात मोठी गर्दी, प्रशासनावर दगडफेकीचा दावा
‘Golden GUYS’ सनी वाकचौरेच्या Mercedesवर पोलिसांची कारवाई! 🚔🚘⚠️
पावसाअभावी सोयाबीन पूर्णपणे वाळलं; शेतकऱ्याने ३ एकर पिकावर फिरवला ट्रॅक्टर!
देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल



























Subscribe to my channel




