नुकतीच एक घटना घडली. अभिनेत्री तृषा हीतमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या स्वातंत्र्यदिनसोहळ्यात दिसली. त्यानंतर मोठे वादळ उठले. तृषा तिथेएका प्रमुख जागी बसली होती. विजय यांच्या कुटुंबाशीसंवाद साधत होती. मग काय, राजकीय टोलेबाजी,सोशल मीडियावर तर्कवितर्क व साहजिकच त्यांच्यानात्याबद्दलच्या चर्चांचा पूर येणे अटळ होते. पण या सगळ्यात सर्वात आधी एकच प्रश्न विचारलापाहिजे : दरवेळी अशा कुठल्याही कथेत स्त्रीच आरोपीका ठरते? ‘दुसरी स्त्री’ ही आपल्या समाजातील सर्वातजुनी आणि कायम राहिलेली एक खलनायिका आहे. तीपुरुषाला भुलवते, घर मोडते, प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेआणि अधिकार नाही तिथे ती घुसखोरी करते; याचनजरेने तिच्याकडे पाहिले जाते. तिने काय परिधान केलेआहे, ती कुठे बसली आहे, तिने कोणाला नमस्कार केलाआणि ती किती आपुलकीने हसली—या प्रत्येक गोष्टीचेबारकाईने परीक्षण केले जाते. तर दुसरीकडे या कथेच्याकेंद्रस्थानी असलेला पुरुष मात्र अगदी ‘निष्क्रिय''दाखवला जातो; जणू काही त्याच्या सभोवतालच्या गोष्टीआपोआपच घडत आहेत! हा कोणाच्या वैयक्तिकआयुष्याचा बचाव नाही. विजय आणि तृषा यांच्या खाजगीआयुष्यातील सत्य शोधणे हे आपले काम नाही. पणसार्वजनिक चर्चा किती सहजतेने सर्व नैतिक जबाबदारीस्त्रीवर ढकलतात आणि पुरुषाच्या भूमिकेकडे पूर्णपणेदुर्लक्ष करतात, यावर हे भाष्य नक्कीच आहे. एखाद्याशक्तिशाली पदावर असलेला पुरुष एखाद्या स्त्रीलाआमंत्रित करतो, तिला सोहळ्यात सहभागी करून घेतो.तिच्याशी मैत्री करतो किंवा संवाद ठेवतो, तर तो त्याचास्वतःचा निर्णय असतो. त्यांच्यात कोणतेही नाते असेल,तर या कथानकात पुरुष काही असहाय पात्राच्या भूमिकेतनाही. तो एक सज्ञान व्यक्ती आहे. पण पुरुषसत्ताकव्यवस्था स्त्रियांनाच एकमेकांविरुद्ध उभे करणे सोपे मानतआली आहे. कदाचित म्हणूनच आजची महत्त्वाकांक्षीस्त्री आपल्याला अस्वस्थ करते. आकर्षक स्त्री आपल्यामनात संशय निर्माण करते. आपल्याला आजही स्त्रिया यामर्यादेत राहणाऱ्या, लाजाळू, नैतिकतेची खात्री देणाऱ्यास्वरूपातच आवडतात. पण त्या सुंदर, यशस्वी, सत्तेच्याजवळ असतील तर आपण त्यांना दोषी ठरवण्यासाठीपुरावे शोधू लागतो. आपण पुरुषांच्या निर्णयांवर प्रखरतेनेप्रश्न का विचारत नाही? प्रभावशाली पुरुषांना त्यांच्यावैयक्तिक किंवा व्यावसायिक नात्यांमध्ये निष्पाप किंवा ‘पॅसिव्ह ’ दाखवणे हा केवळ लैंगिक भेदभाव नाही, तरअत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. अनेक शतकांपासून स्त्रियापुरुषांच्या निर्णयांचे परिणाम भोगत आल्या आहेत.पत्नीकडून संसार टिकवण्याची अपेक्षा केली जाते,आईकडून कुटुंब एकत्र ठेवण्याची, मुलीकडून घराची‘प्रतिष्ठा’ जपण्याची आणि ‘दुसऱ्या स्त्रीकडून’ सर्वदोषांचे खापर स्वतःच्या डोक्यावर घेण्याची अपेक्षा केलीजाते. बहुधा आता ही पारंपरिक पटकथा बदलण्याची वेळआली आहे. या प्रकरणात स्त्रीवादी दृष्टिकोनाचा प्रश्नअत्यंत सरळ आणि सोपा आहे : पुरुषांच्या निर्णयांचीनैतिक जबाबदार स्त्रीला मानणे आपण कधी थांबवणार?आपण हे थांबवणार नाही, तोपर्यंत प्रत्येक तथाकथित‘दुसऱ्या स्त्रीला’ जनमताच्या न्यायालयात आरोपीच्यापिंजऱ्यात उभे केले जाईल—आणि पुरुष मात्र अत्यंतआरामात दोषांच्या चौकटीबाहेर निसटून जाईल! (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


