सर्वच व्यक्तींमध्ये सर्वच प्रकारची योग्यता असते असे नव्हे. काही व्यक्तींमध्ये काही विशिष्ट गुण असतात. परंतु आपल्या एखाद्या विशिष्ट दृष्टीने ते अयोग्य असतात. योग्यता आणि अयोग्यता याचे मानक व्यक्ती, स्थळ, काळ, उपयुक्तता, प्रासंगिकता अशा अनेक कारणपरत्वे बदलतात. वर्तमान परिस्थिती परिवर्तनाचे युग आहे. पूर्वी बदल व्हायचे परंतु ते मंद गतीने. आज बदल होतात पण ते अत्यंत वेगाने, गतीने. या बदलाच्या गतीनुसार प्रत्येकाच्या अपेक्षा, आवश्यकता, अनिवार्यता बदलत आहेत. म्हणूनच प्रत्येकाची जीवनशैली देखील बदलत आहे. त्यामुळे कोणी अमुक व्यक्तीने एखाद्या परिस्थितीत आपल्या मनाप्रमाणे चालावे, वागावे हे आज अयोग्य ठरत आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातील राहणीमान आणि आजच्या काळात असलेल्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसून येत आहे. त्यामुळे आजचे स्वाभाविक वर्तन हे वर्तमानातील सहज संस्कार बनले आहे. पूर्वीच्या वळणाने संस्काराने चालणारे खूप कमी व्यक्ती उरलेले असताना त्यांना हे न पटणे स्वाभाविक आहे. पिढीगत अंतर म्हणजेच जनरेशन गॅप हा मोठ्या दरीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी निदर्शनास येतो. पूर्वेकडील देशांमध्ये याबाबतीत खूप मोठे बदल फार पूर्वी घडून गेलेले आहेत. तेथील सभ्यता आणि संस्कृती आता वेगळी आहे. या तुलनेमध्ये पूर्वेकडील देशात म्हणजेच भारतामध्ये अजून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर भारतीय सभ्यता आणि संस्कृती टिकून आहे. परंतु जग चालले आहे. त्या गतीने चालण्याचा प्रयत्नही नवीन पिढी करत आहे. हे संतुलन या ठिकाणी मला फार महत्त्वाचे वाटते. बदल स्वीकारायचा आणि संस्कारही विसरायचे नाहीत हे फार मोठे वाण किंवा व्रत आहे. नवीन पिढीने याचा स्वीकार केलेला आहे. कमी अधिक प्रमाणात का होईना आपल्या देशांमधील नवीन पिढीत काही संस्कार, काही मूल्य आजही विद्यमान आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. काही व्यक्तींना दुसऱ्याचा उत्कर्ष ही सहन होत नाही. काही व्यक्ती दुसऱ्यांच्या विकासामध्ये, सफलतेमध्ये सतत बाधा बनतात. असे व्यक्ती स्वतःच्या उन्नती बद्दल सुद्धा उदासीनच असतात. कारण त्यांची शक्ती वेळ सतत दुसऱ्याचा बाबत विचार करण्यामध्येच खर्च होते. अशा प्रकारचे योग्यता आणि पात्रता नसलेल्या व्यक्तींचा सहवास टाळावा. आपल्या भविष्याच्या दृष्टीने हे योग्यच. आज जगाच्या बरोबरीने चालायचे असताना प्रत्येकाला सहवास देखील त्या पद्धतीचाच असावा हे अयोग्य नाही. अत्यंत गतीने होणारी प्रगती आपल्यातही व्हावी प्रयत्न देखील चुकीचा नाही. म्हणून यात अडथळा निर्माण करणारे व्यक्ती कोणी टाळत असेल तरीही ते ठीकच म्हणावे लागेल. त्यामुळे असे वाटते की आज हा आग्रह कालबाह्य होतो की मला गृहीत धरले नाही, मला टाळले. हे टाळणे एखाद्याच्या दृष्टीने अयोग्य असले तरी दुसऱ्याच्या दृष्टीने ते योग्य असू शकते. कारण त्या ठिकाणी त्याची ती आजची आवश्यकता असते आणि अनिवार्यता देखील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



