माणसाच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या दृष्टीने गुरुला ईश्वराहून मोठं म्हटलं तरी चालेल. ईश्वर प्रत्येक ठिकाणी असतो परंतु तो तितक्या जीवांना समजतो? प्रत्येक जीवातला सृष्टीतला, निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात वसलेला ईश्वर समजून देण्याचं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य गुरु करत असतात. जो आपल्याहून अधिक बुद्धिमान, अनुभवी, समजदार, काहीतरी जास्त येणारा असा जो कोणीतरी सतत आपल्या कृतीतून वक्तव्यातून, कळकळीची विनंती करतो व इतरांना त्या बाबतीत सुधारण्याचा प्रयत्न करत असतो तोच तर गुरू असतो. साधारणपणे आपण सुरुवातीला आई-वडिलांकडून, घरातील मोठ्या व्यक्तींकडून, समाजातील वयस्कर व्यक्तींकडून आणि शाळेतील शिक्षकांकडून काही तरी सतत शिकत असतो. तर काही व्यक्ती मात्र विशिष्ट विषयांची शिकवण देत असतात. शिक्षण उद्देशाच्या दृष्टीने गुरु दोन प्रकारचे म्हणावे लागतील. लौकिक गुरु : आई-वडील, शिक्षक आणि इतर. जगण्याचे नैतिक नियम शिकवणारे, आपल्यात सतत काही ना काही सुधारणा करणारे. भौतिकतेच्या विषयात व संसारासंबंधी जगण्याशी निगडित गोष्टी शिकवणारे त्यांनाही पर्यायाने गुरु म्हणावे लागेल. लोकोत्तर गुरु : आध्यात्मिक शिक्षण देणारे, स्वतः साधनेमध्ये असून इतरांना साधना आदर्श, प्रशिक्षण देणारे, धर्माचे अनुकरण करत धर्माचा प्रसार करणारे, मुक्ती मार्गाचा स्वतः उद्देश धारण करून इतरांना त्या मार्गावर प्रवृत्त करणारे. अशा सर्व साधू संत प्रवर्तक महात्म्यांना गुरु म्हणतात. आपल्याला सर्व काही समजतं असे नव्हे. ते जसं आहे तसं किंवा असेल तसं आणि त्याचे सत्य स्वरूप समजण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. आपल्यामध्ये ज्ञान असतं परंतु ते निमित्ताने प्रगट होण्यास स्पष्ट होण्यास गुरुचे मोलाचे योगदान असते. दिवा असतो, वात असते, तेल असते परंतु त्याला प्रज्वलित करणारा कोणीतरी असावा लागतो. तोच तो गुरु. मराठीत म्हटलं आहे ज्याच्या जीवनात गुरु त्याचे जीवन खऱ्या अर्थाने सुरू. आपल्या जीवनाच्या उद्देशानुसार आपण गुरुची निवड केली पाहिजे. गुरु मध्येही उत्कृष्ट गुरु असतात. हिंदीमध्ये म्हणतात; पानी पीजे छान के गुरु कीजे जान के अर्थात् : यांच्याकडून आयुष्याचे जगण्याचे आणि मुक्तीचे तत्वज्ञान घ्यायचे आहे, ज्यांच्या मार्गाचे अनुसरण करायचे आहे, ज्यांच्या मागे मागे चालायचे आहे; तो गुरु देखील आपण योग्य असा निवडला पाहिजे. तर या ठिकाणी उत्कृष्ट गुरु कोणास म्हणावे मूळ शास्त्रात याचा उल्लेख आढळतो: सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम गुरु : जो १ वितराग : राग द्वेषाने रहित
२ सर्वज्ञ : ज्ञानी [ संपूर्ण ]
३ हितोपदेशी शास्त्राचा कर्ता [ सर्व जीवांना कल्याणकारी मार्ग दर्शवणारा असा आहे. आपल्या जीवनाचा सर्वांगीण सुधार करत मुख्य उद्देशाकडे नेऊन पोहोचवणाऱ्या गुरुबद्दल आपल्याला सतत आदर व भक्ती भाव असला पाहिजे. गुरुच्या वचनावर इतकी श्रद्धा असायला हवी की " गुरुचा शब्द आदेश आणि वाक्य प्रमाण " असेच मानावे. एकदा का गुरु जाणला, मानला की त्या आदरणीय गुरूंचे आपल्याकडे सतत लक्ष असते. ते आपल्यासमोर असोत अथवा नसोत, ते जवळ असोत अथवा दूर असोत, ते विद्यमान असोत अथवा निर्वाण स्थानी पोहोचलेले असोत. असतील तेथून गुरूंचे आपल्यावर सतत लक्ष असते. म्हणून वेळ संकटाची असो नसो, वेळ आनंदाची दुःखाची कुठलीही असेल ; वेळोवेळी आठवेल तेव्हा, शक्य होईल तेव्हा गुरुचे नामस्मरण करावे. एक अद्भुत शक्ती आपल्या सोबत असल्याचा अनुभव होईल. म्हणून जीवनामध्ये गुरुचे स्थान ईश्वराहून देखील महत्त्वाचे आहे असेच मला वाटते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

























Subscribe to my channel



