आपली दोन घर असतात – एक लहान आणि एक मोठे. लहान घर म्हणजे चार भिंतींचे आपले निवासस्थान. त्यातसोफा असतो. जेवणाचे टेबल, बिछाना असतो. या घराचीआपण विशेष काळजी घेतो. ते स्वच्छ ठेवतो, जपतो;कारण ते आपल्याला सुरक्षितता देते. धूळ, उष्णता, थंडी,वारा व पावसापासून संरक्षण करते. याचप्रमाणे आपले आणखी एक मोठे घर आहे – पृथ्वीचेपर्यावरण. हेही आपले संरक्षण करते. हे मोठे घर नसते तरसूर्याची किरणे इतकी तीव्र असती की ती सहन करणेअशक्य झाले असते. किंवा पृथ्वीचे तापमान इतके कमीझाले असते की येथे जीवनच शक्य राहिले नसते. मगअसे असतानाही आपण या मोठ्या घराची काळजी काघेत नाही? पर्यावरणात अतिउष्णता, अतिथंडी किंवाअतिवृष्टी झाली, तर त्याचा परिणाम थेट आपल्यावरहोतो. एकूणच पर्यावरणात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचापरिणाम आपल्या जीवनावर होतो. पण आपण काहीकरतो, त्याचाही परिणाम पर्यावरणावर होतो. प्रत्यक्षात आधुनिक जीवनात पर्यावरणावर परिणाम होत नाही असेमाणसाचे फार कमी काम असेल. दुर्दैवाने आपल्याबहुतांश कृती पर्यावरणाला सकारात्मक नव्हे, तरनकारात्मक पद्धतीने प्रभावित करतात. हे पर्यावरण,म्हणजेच आपले हे मोठे घर, आपल्याला जीवन देते. तेचआपल्याला हवा, पाणी, अन्न वजगण्यालायक परिस्थितीउपलब्ध करून देते. पण त्याच्या बदल्यात आपण त्यालाकाय देतो? आपण ते प्रदूषित करतो. त्यात कार्बनडायऑक्साइड आणि इतर प्रदूषक सोडतो. आपणस्वयंपाक करतो, प्रवास करतो, वीज वापरतो किंवाएखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा प्रत्येक वेळी कार्बनडायऑक्साइडच्या रूपातील अदृश्य कचरा वातावरणातसोडतो. हाच कचरा पृथ्वीचे तापमान वाढवण्याचे कामकरतो. आपल्याला वाटते की हवामान बदल किंवा प्रदूषणकेवळ कारखान्यांमुळे होते. तसे नाही. आपल्या दैनंदिनजीवनातील आणि कारखान्यांत तयार होणाऱ्या वस्तूंच्याअनियंत्रित वापरामुळेही ते मोठ्या प्रमाणात वाढते. आपणसर्वजण दररोज, किंबहुना प्रत्येक मिनिटाला, हा अदृश्यकचरा फेकून आपल्या वातावरणरूपी मोठ्या घराचेनुकसान करत आहोत. एकदा माझ्या व्याख्यानात मीश्रोत्यांना म्हणालो, //"मी तुम्हा प्रत्येकाला थोडासा कचरादेतो. तो तुम्ही घरी नेऊन स्वतःच्या घरात टाकाल का? ‘सर्वांनी तात्काळ नकार दिला. कुणी म्हणाले, //"बायकोरागावेल.//" कुणी म्हणाले, //"आई ओरडेल.’ तेव्हा मीविचारले, //" आपण आपल्या छोट्या घरातही कचराटाकत नाही, तेव्हा आपल्याला जीवन देणाऱ्या या मोठ्याघरात कचरा कसा टाकतो?//" आज देश-विदेशात अवेळीपाऊस पडत आहे. थंड युरोपात जीवघेणी उष्णतेची लाटआली आहे. जंगलांना आग लागत आहे. हवामानातील हाअसमतोल म्हणजे निसर्गाची प्रतिक्रिया आहे. काहीतरीगंभीर बिघडत असल्याचा तो निसर्गाचा इशारा आहे. कधीकधी मला वाटते, आपणच निसर्ग असतो, तर कदाचितअशीच शिक्षा दिली असती. कारण आपण त्याच्या घरातकचरा पसरवत आहोत. त्याचे संतुलन बिघडवत आहोतआणि तरीही सर्व काही पूर्ववत राहावे, अशी अपेक्षा करतआहोत. आज आपण पृथ्वीवर कचरा टाकत आहोत,त्याची शिक्षा पुढील पिढ्यांना भोगावी लागणार आहे. हेकटू सत्य आपल्याला जागे करण्यासाठी पुरेसे आहे.कदाचित याच जाणिवेतून पर्यावरण संवर्धनाची खरीसुरुवात होईल आणि मर्यादित संसाधने असलेल्या यापृथ्वीवर आपल्या गरजाही मर्यादित ठेवण्याचा आपणप्रयत्न करू. हवामान सुधारणा केवळ तंत्रज्ञानाने किंवा कायद्यांनी सुरूहोत नाही. ती जागरूकतेतून सुरू होते. ती संयमातून सुरूहोते. आणि आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या या मोठ्याघराशी तितक्याच आदराने वागण्यापासून सुरू होते,जितक्या आदराने आपण आपल्या शयनकक्षाची काळजीघेतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

आटलेल्या नदीपात्रात गणरायाचं विसर्जन; दुसऱ्याच दिवशी मुसळधार पाऊस! 🙏🌧️
TVS XLवर चक्क ६ मुलांना घेऊन प्रवास; धोकादायक VIDEO व्हायरल! 🛵⚠️
प्रसिद्ध हॉटेलमधील कथित VIDEO व्हायरल; स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह! 🍽️⚠️
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




