
Pune : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर काल मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या गंभीर अपघाताने एकच खळबळ उडवून दिली. अत्यंत ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहतूक करणारा टँकर बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ उलटल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली. परिणामी द्रुतगती मार्गावर भीतीचं वातावरण पसरले असून महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. वाहतूक 15 तासांपासून ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे.
टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी पलटी
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. आडोशी बोगद्याजवळील अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी पलटी झाला. अपघातानंतर काही वेळातच टँकरमधून प्रोपलीन गॅसची गळती सुरू झाली. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणताही अपघात किंवा ठिणगी मोठ्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खोपोली येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली, तर पुणे मार्गिकेवरील एका लेनवरून रात्री बारानंतर मर्यादित स्वरूपात वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे अनेक तास अडकून पडलेल्या वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला.
|
|
मात्र, अपघातानंतर अनेक तास उलटूनही गॅस गळती रोखण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. तज्ञ पथक गळती थांबविण्याचे प्रयत्न करत असून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात येईपर्यंत अपघातग्रस्त टँकर हटविणे धोकादायक मानले जात आहे. त्यामुळे आडोशी बोगदा परिसरातील मुंबई मार्गिका अद्याप बंद ठेवण्यात आली आहे. बोरघाट परिसरात वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू असून दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांनी जुन्या महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतूक बदल करण्यात आलेले आहेत. आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेसवे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी कृपया खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
१. ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)
२. माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)
कृपया लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel




1 thought on “Mumbai–Pune Expressway : आडोशी बोगद्याजवळ टँकर पलटी, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एक्सप्रेसवेवर वाहतूक ठप्प, पर्यायी मार्ग कोणते?”