हिंगोली: महाराष्ट्रातील मराठवाडा भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी आणि सक्तीच्या कर्जवसुलीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नांदेड आणि लातूरपाठ अब हिंगोली जिल्ह्यातून एक अत्यंत क्लेशदायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाघजळी गावात मायक्रो फायनान्स आणि खासगी वित्तीय कंपन्यांच्या सततच्या आणि जाचक तगाद्याला कंटाळून तब्बल पाच महिलांना आपली राहती घरे विक्रीसाठी बाहेर काढण्याची नामुष्की ओढवली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच उद्ध्वस्त झालेला शेतकरी आणि ग्रामीण भागातील मजूर वर्ग फायनान्स कंपन्यांच्या या अमानुष वसुलीमुळे पूर्णपणे हतबल झाल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
यंदाच्या हंगामात अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे किंवा लहरी हवामानामुळे ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीतून म्हणावे तसे उत्पन्न हाती आले नसल्याने शेतकरी आणि शेतमजुरांसमोर पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत शासनाने देखील कर्जवसुलीसाठी कोणतीही सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, शासनाच्या या निर्देशांना आणि नियमांना पायदळी तुडवत अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी वसुलीसाठी कर्जदारांच्या घरी जाऊन तीव्र दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वाघजळी गावातील जवळपास ७० ते ८० नागरिकांनी (विशेषतः बचत गटांच्या माध्यमातून) विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्जे घेतली आहेत. यामध्ये वैयक्तिक कर्ज, व्यवसाय व शेतीसाठी घेतलेल्या कर्जांचा समावेश आहे. मात्र, रोजगार बुडाल्यामुळे आणि उत्पन्नाचे साधन बंद झाल्यामुळे हप्ते भरणे अशक्य झाले आहे. वसुलीसाठी येणारे कर्मचारी सर्रासपणे कर्जदारांच्या घरी येऊन तासनतास बसून राहतात, अपमानास्पद भाषा वापरतात आणि वारंवार फोन करून मानसिक त्रास देतात. या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळून वाघजळी येथील पाच महिलांनी आपली राहती घरे चक्क विक्रीसाठी काढली आहेत. विशेष म्हणजे, काही महिलांच्या घरांच्या दरवाजांवर ‘मायक्रो फायनान्सचे कर्ज फेडण्यासाठी घर विकणे आहे’ असे फलकही लावण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
याच गावातील धम्मरत्न मोरे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "मी दिव्यांग असून वर्षभरापूर्वी एका फायनान्स कंपनीकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र दुष्काळामुळे सध्या उत्पन्नाचे कोणतेही साधन उरलेले नाही. तरीही कंपनीचे कर्मचारी रात्री नऊ वाजेपर्यंत घरी येऊन बसतात." त्यांच्यासह मिनाबाई मोरे, रेखाबाई मोरे, नंदाबाई मोरे, दीपाली मोरे आणि चंद्रभागाबाई मोरे यांच्याकडे असलेल्या थकीत कर्जाच्या रकमेवरून फायनान्स कंपन्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांना अशा प्रकारे उद्ध्वस्त करणाऱ्या या खासगी कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि शेतकरी-मजूर वर्गाला दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी आता सर्वसामान्यांमधून केली जात आहे.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




