पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:काम पूर्ण झाल्यानंतरही बदलांबाबत जागरूक राहा

आयुष्यात कोणतेही काम हाती घ्याल तेव्हा चार टप्प्यांतून जा. पहिला- आरंभ. यात पूर्ण काळजी घेत आपला उत्साह टिकवून ठेवा. कारण, नेमके कोणते काम करायचे, याची निवड तुम्ही याच टप्प्यात करता. त्यानंतर- मध्य. या वेळी कामावर आपली पूर्ण पकड असली पाहिजे. या काळात आपला सर्व अनुभव पणाला लावा. तिसरा- शेवट. या वेळी स्वतःला समाधान मिळणे खूप गरजेचे असते. आणि हाच तो टप्पा असतो, जेव्हा आपण आपली ऊर्जा पुन्हा मिळवायला हवी. चौथा- शेवटानंतर पुन्हा सुरुवात. कारण, जीवनात कोणत्याही गोष्टीचा अंत नसतो. या स्पर्धेच्या युगात बदल खूप वेगाने होतील. त्यामुळे जे काही काम कराल, ते त्याच्या सर्वोच्च शिखरापर्यंत घेऊन जा. मात्र त्यानंतरही बदलांबाबत जागरूक राहा. जसे की, कोणत्याही कलाकाराचे सादरीकरण संपते, पण कला शिल्लक राहते. कला कधीही संपत नाही. व्यासपीठावरून कथाकार जेव्हा कथेचा समारोप करतात, तेव्हा ते सांगतात की, कथा कधीच संपत नाही. ती निरंतर असते, ती फक्त विराम घेते. कर्मयोगही असाच निरंतर आहे.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *