ओपनएआय आणि अँथ्रॉपिकमध्ये सुरक्षेशी संबंधितत्रुटी समोर आल्या. त्यानंतर दोन्ही कंपन्यांच्याएआय-सुरक्षा संशोधकांनी एक तर राजीनामे दिले,किंवा ‘फ्रंटियर एआय'' ला पुढे नेण्याची ही आंधळीशर्यत बेजबाबदारपणाची आहे हे मान्य केले. सध्याचेएआय मॉडेल्स मानवाच्या उद्देशांशी सुसंगत नाहीत हेस्पष्ट आहे. तरीही इथे एक प्रश्न विचारणे गरजेचेआहे-कोणता माणूस आणि कोणाचा उद्देश? एआय क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचा राजकीय प्रभावआणि संपत्ती गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यांचेहितसंबंध सामान्य कामगारांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. विकसनशील देशांतील लोकांचा तर विचारच सोडूनद्या. समाजाच्या गरजेनुसार एआयला घडवणे आणि एआयवर लगाम लावणे, या दोन्ही गोष्टी एकाच तराजूत तोलणे चुकीचे ठरेल. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याअसल्या तरी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्याउपायांची गरज आहे. समस्या ही नाही की एआयमॉडेल्स खूप पुढे निघून गेले आहेत. योग्य प्रशिक्षण व देखरेख असूनही हे मॉडेल्स मानवी नियंत्रणाबाहेरजातील, असा कोणताही ठोस पुरावा मला तरी दिसतनाही. मूळ समस्या अशी आहे की, या क्षेत्रातील प्रमुखलॅब्स आपल्या मॉडेल्सना एका विकृत बुद्धिमत्तेचीनिर्मिती होईल असे प्रशिक्षण देत आहे. नुकत्याचघडलेल्या सुरक्षेच्या घटनांवरून हे स्पष्ट होते की,एआयची क्षमता वेगाने वाढत आहे.तिचा वापर चुकीचेउद्देश साध्य करण्यासाठीही केला जात आहे. ‘िरइन्फोर्समेंट लर्निंग''चा परिणाम असा होतो की,मॉडेलचे वर्तन विसंगत व विचित्र बनते. उदाहरणार्थ-सोपी कामे पूर्ण करताना फेरफार करणे.सोशलमीडियाच्या घातक प्रगतीमागेही वेगाने वाढ करण्याचीआणि मर्यादित उद्दिष्टे गाठण्याची हीच मानसिकता होती.तेव्हा या सर्व गोष्टी अधिक चिंताजनक वाटू लागतात.सोशल मीडिया अल्गोरिदमच्या तुलनेत एआयची क्षमताकित्येक पटींनी जास्त आहे. त्यामुळे अशा चुकांचीपुनरावृत्ती करणे खूप महाग पडू शकते. विकृत बुद्धिमत्तानिर्माण होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे जनरलइंटेलिजन्सचा दावा केला जात असला, तरी AIमॉडेल्सना ‘रीइन्फोर्समेंट लर्निंग''द्वारे विशिष्टकामांसाठीच प्रशिक्षित केले जाते. पण अशा कामांसाठीबनवलेल्या विशेष ‘डोमेन-स्पेसिफिक'' मॉडेल्सकडूनकाम करून घेण्याऐवजी संपूर्ण लार्ज लँग्वेज मॉडेललाच(एलएलएम) वारंवार री-कॅलिब्रेट केले जात आहे. हीपद्धत योग्य नाही. या पद्धतीमुळे अशी शक्यता निर्माणहोते की, एखाद्या मॉडेलला काही विशिष्ट निकष दिलेजातात तेव्हा ते ‘ओव्हरफिटिंग''सारख्या क्लृप्त्यावापरून जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करते. यादरम्यानमॉडेल काही अतिरिक्त क्षमता नक्कीच मिळवते. पणयाच क्षमता त्याच्या सामान्य कामगिरीला विकृत करूशकतात. अनेकदा तर हे अशा मार्गांनी होते. त्याचाअंदाज लावणेही कठीण असते. माझा संशय बरोबरअसेल, तर आपण ‘सुपरइंटेलिजन्स''च्या दिशेनेजाणाऱ्या एखाद्या मॉडेलचा सामना करत नसूनपत्त्यांपासून बनवलेल्या नाजूक ढाच्याशी झुंजत आहोत.त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्यास तो गडबड करेलआणि कोसळून पडेल. एआय हे सुपरकारसारखे आहे.त्याला स्वतःचा मेंदू आहे. तो चालकापेक्षा जास्त हुशारअसल्याने स्टीअरिंग स्वतःच्या हातात घेऊ इच्छिते. पणत्याचे स्टीअरिंग आणि ब्रेक सिस्टीमच नीट काम करतनसेल तर? गरजेच्या वेळी तुम्ही कारला योग्य दिशेलावळवू शकत नसाल किंवा ब्रेक लावू शकत नसाल तरअशा कारचा काय उपयोग? कदाचित तोपर्यंत तीरस्त्यावर चालण्यास योग्य नसते. आपण ती चालवूचनये. ( प्रोजेक्ट सिंडिकेट) तुम्ही एखाद्या कारला योग्य दिशेला वळवूशकत नसाल किंवा वेळेवर ब्रेक लावूशकत नसाल, तर अशा कारचा कायफायदा? कदाचित ती रस्त्यावरधावण्यासाठी सुरक्षित होत नाही, तोपर्यंतती चालवूच नये. एआयची आजचीस्थितीसुद्धा काहीशी अशीच आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
महाराष्ट्र
- जालना: महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना जालन्यात भाजप नेत्यावर भजनात उधळल्या नोटा; संतापजनक प्रकारानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ!
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




