डेरॉन एस्मोग्लू यांचा कॉलम:समस्या एआयमध्ये नव्हे ,प्रशिक्षण‎ देण्याच्या चुकीच्या पद्धतीत‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎ओपनएआय आणि अँथ्रॉपिकमध्ये सुरक्षेशी संबंधित‎त्रुटी समोर आल्या. त्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या‎एआय-सुरक्षा संशोधकांनी एक तर राजीनामे दिले,‎किंवा ‘फ्रंटियर एआय'' ला पुढे नेण्याची ही आंधळी‎शर्यत बेजबाबदारपणाची आहे हे मान्य केले. सध्याचे‎एआय मॉडेल्स मानवाच्या उद्देशांशी सुसंगत नाहीत हे‎स्पष्ट आहे. तरीही इथे एक प्रश्न विचारणे गरजेचे‎आहे-कोणता माणूस आणि कोणाचा उद्देश?‎ एआय क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचा राजकीय प्रभाव‎आणि संपत्ती गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यांचे‎हितसंबंध सामान्य कामगारांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. ‎‎विकसनशील देशांतील लोकांचा तर विचारच सोडून‎द्या. समाजाच्या गरजेनुसार एआयला घडवणे आणि ‎‎एआयवर लगाम लावणे, या दोन्ही गोष्टी एकाच तराजूत ‎‎तोलणे चुकीचे ठरेल. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या‎असल्या तरी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या‎उपायांची गरज आहे. समस्या ही नाही की एआय‎मॉडेल्स खूप पुढे निघून गेले आहेत. योग्य प्रशिक्षण व ‎‎देखरेख असूनही हे मॉडेल्स मानवी नियंत्रणाबाहेर‎जातील, असा कोणताही ठोस पुरावा मला तरी दिसत‎नाही. मूळ समस्या अशी आहे की, या क्षेत्रातील प्रमुख‎लॅब्स आपल्या मॉडेल्सना एका विकृत बुद्धिमत्तेची‎निर्मिती होईल असे प्रशिक्षण देत आहे. नुकत्याच‎घडलेल्या सुरक्षेच्या घटनांवरून हे स्पष्ट होते की,‎एआयची क्षमता वेगाने वाढत आहे.तिचा वापर चुकीचे‎उद्देश साध्य करण्यासाठीही केला जात आहे.‎ ‘िरइन्फोर्समेंट लर्निंग''चा परिणाम असा होतो की,‎मॉडेलचे वर्तन विसंगत व विचित्र बनते. उदाहरणार्थ-‎सोपी कामे पूर्ण करताना फेरफार करणे.सोशल‎मीडियाच्या घातक प्रगतीमागेही वेगाने वाढ करण्याची‎आणि मर्यादित उद्दिष्टे गाठण्याची हीच मानसिकता होती.‎तेव्हा या सर्व गोष्टी अधिक चिंताजनक वाटू लागतात.‎सोशल मीडिया अल्गोरिदमच्या तुलनेत एआयची क्षमता‎कित्येक पटींनी जास्त आहे. त्यामुळे अशा चुकांची‎पुनरावृत्ती करणे खूप महाग पडू शकते. विकृत बुद्धिमत्ता‎निर्माण होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे जनरल‎इंटेलिजन्सचा दावा केला जात असला, तरी AI‎मॉडेल्सना ‘रीइन्फोर्समेंट लर्निंग''द्वारे विशिष्ट‎कामांसाठीच प्रशिक्षित केले जाते. पण अशा कामांसाठी‎बनवलेल्या विशेष ‘डोमेन-स्पेसिफिक'' मॉडेल्सकडून‎काम करून घेण्याऐवजी संपूर्ण लार्ज लँग्वेज मॉडेललाच‎(एलएलएम) वारंवार री-कॅलिब्रेट केले जात आहे. ही‎पद्धत योग्य नाही. या पद्धतीमुळे अशी शक्यता निर्माण‎होते की, एखाद्या मॉडेलला काही विशिष्ट निकष दिले‎जातात तेव्हा ते ‘ओव्हरफिटिंग''सारख्या क्लृप्त्या‎वापरून जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करते. यादरम्यान‎मॉडेल काही अतिरिक्त क्षमता नक्कीच मिळवते. पण‎याच क्षमता त्याच्या सामान्य कामगिरीला विकृत करू‎शकतात. अनेकदा तर हे अशा मार्गांनी होते. त्याचा‎अंदाज लावणेही कठीण असते. माझा संशय बरोबर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎असेल, तर आपण ‘सुपरइंटेलिजन्स''च्या दिशेने‎जाणाऱ्या एखाद्या मॉडेलचा सामना करत नसून‎पत्त्यांपासून बनवलेल्या नाजूक ढाच्याशी झुंजत आहोत.‎त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्यास तो गडबड करेल‎आणि कोसळून पडेल. एआय हे सुपरकारसारखे आहे.‎त्याला स्वतःचा मेंदू आहे. तो चालकापेक्षा जास्त हुशार‎असल्याने स्टीअरिंग स्वतःच्या हातात घेऊ इच्छिते. पण‎त्याचे स्टीअरिंग आणि ब्रेक सिस्टीमच नीट काम करत‎नसेल तर? गरजेच्या वेळी तुम्ही कारला योग्य दिशेला‎वळवू शकत नसाल किंवा ब्रेक लावू शकत नसाल तर‎अशा कारचा काय उपयोग? कदाचित तोपर्यंत ती‎रस्त्यावर चालण्यास योग्य नसते. आपण ती चालवूच‎नये. ( प्रोजेक्ट सिंडिकेट)‎ तुम्ही एखाद्या कारला योग्य दिशेला वळवू‎शकत नसाल किंवा वेळेवर ब्रेक लावू‎शकत नसाल, तर अशा कारचा काय‎फायदा? कदाचित ती रस्त्यावर‎धावण्यासाठी सुरक्षित होत नाही, तोपर्यंत‎ती चालवूच नये. एआयची आजची‎स्थितीसुद्धा काहीशी अशीच आहे.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *