जैन धर्मामध्ये २४ तीर्थंकर परंपरा आहे. जैन धर्माचे संस्थापक प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव आदिनाथ हे आहेत. तर २४ वे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर हे होते. भगवान महावीरांचा जन्म ई.स. पूर्व ५९९, चैत्र शु. त्रयोदशी या दिवशी क्षत्रिय, इक्ष्वाकु वंशीय राजा सिद्धार्थ,राणी त्रिशला देवी यांच्या पोटी वैशाली गणतंत्र राज्यात क्षत्रिय कुंडलपुर ( वर्तमान नालंदा जिल्हा, आजची बिहारची राजधानी पटना पासून उत्तरेस ६० किमी,बिहार ) या ठिकाणी झाला. वर्धमान महावीर तीस वर्ष गृहवासात राहिले. साडेबारा वर्ष साधनेत राहिले आणि पुढे तीस वर्ष सर्वज्ञता प्राप्तीनंतर त्यांनी अखिल जीवांच्या कल्याणासाठी अहिंसा सत्य, दया, करुणेचा उपदेश केला. भगवान महावीरांचा विहार एखाद्या वाहत्या नदीप्रमाणे चालू राहिला. जैन श्रमणांचे जीवन वाऱ्याप्रमाणे असते. त्यांनी एके ठिकाणी कधी राहायचे नसते. केवलज्ञान प्राप्तीनंतर २९ वर्षे ३ महिने आणि २४ दिवस त्यांनी सतत विहार करून धर्मामृताचा वर्षाव केला. महावीरांनी विहार कालामध्ये मुनी, आर्यिका,श्रावक आणि श्राविका या प्रकारचा चतुर्विध धर्मसंघ निर्माण केला. त्यापैकी मुनी आणि आर्यिका घरादाराचा त्याग करून धर्म साधना करीत. संघात साधूंची संख्या १४००० होती तर आर्यिकां ची संख्या ३६००० होती. १९०००० ग्रहस्थ श्रावक तर ३१८००० ग्रहस्थि श्राविका होत्या. वर उल्लेखिलेल्या संघात मोठे मोठे राजे,राजकुमार,राजकुमारी, राण्या,श्रेष्ठी,सावकार ,ब्राह्मण विद्वान,क्षत्रिय इत्यादी सर्व जातीतील कुळातील लोक होते. त्यात धनवानही होते आणि गरीबही होते. आर्यिकांचे नेतृत्व महासती चंदनाकडे होते. राजकुमारी चंदनाने महावीरांचे शिष्यत्व पत्करून विशुद्ध जीवनाचा अंगीकार केला होता. या चतुर्विध धर्म संघाचा अधिनायक इंद्रभूती गौतम हा श्रेष्ठ तत्वज्ञ होता. इंद्रभूती गौतमा प्रमाणेच महावीरांच्या धर्म संघात अग्निभूती, वायुभूती, आर्य सुधर्मा, मंडीकपुत्र, मौर्यपुत्र, अकंपित, अचलवृत्त, मैत्रेय आणि प्रभास असे आणखी दहा गणधराचार्य होते. महावीरांच्या धर्म संघाचे हे नायक होते. वरील संघ व्यवस्था करून भगवान महावीरांनी मानव जातीवर फार मोठे उपकार केले आहेत. मिथ्या मार्गाचे अनुकरण करणाऱ्या जनतेला सन्मार्गावर आणण्याचे महत्तम कार्य संघातील सर्व घटकांनी मोठ्या तळमळीने केले. भगवान महावीर गावोगाव विहार करत पावापुरीस पोहोचले. पावापुरीतील राजा हस्तीपाल आणि त्याच्या प्रजेने भगवंताचे दर्शन घेतले. भगवंतांनी त्यांना निर्वाणाचे रहस्य समजावून सांगितले. भगवान महावीर हे निर्वाण विषयाचे सर्वाधिक शक्ती संपन्न प्रवक्ते होते. गौतम स्वामी भगवंताच्या सर्व संन्यस्त साधूंचे प्रमुख म्हणजेच गणधर या पदावर नियुक्त होते, ते तत्त्वज्ञानाचे प्रकांड पंडित होते. प्रवचनानंतर भगवान गौतम स्वामीस म्हणाले, गौतम! येथून काही अंतरावर सोमशर्मा नावाचा ब्राह्मण राहतो. तो तत्वाचा जिज्ञासू असून त्यास काही शंका आहेत. तुमच्या उपदेशाने तो नि:शंक होईल. तुम्ही तेथे जाऊन त्याला उपदेश करावा. भगवंताचे वचन शिरोधार्य मानून गौतमस्वामी सोमशर्मास उपदेश करण्यास गेले. परम शुद्ध ज्ञानाच्या सर्वोच्च अवस्थेस प्राप्त झालेल्या भगवान महवीरांना स्पष्ट दिसत होते की अति सहवासा मुळे गौतमाचे आपल्यावर अत्यंत असे जिव्हाळा युक्त प्रेम आहे, या प्रेमाच्या बंधनामुळेच गौतमास कैवल्य म्हणजेच सर्वज्ञतेची प्राप्ती होत नाही. कदाचित म्हणूनच भगवंतांनी स्वतःच्या निर्वाणाचा क्षण समीप जाणून गौतमास स्वतः पासून दूर पाठवले. केवलज्ञानी सर्वज्ञ भगवंताच्या अनंत करुणेची ही साक्षच होती. भगवान महावीर दोन दिवसांपासून निर्जल उपवास करत होते. त्या काळात त्यांनी अत्यंत प्रदीर्घ असे प्रवचन केले. त्यातच त्यांनी कर्मफलाचा विस्तारही विवेचन केला. आपले प्रवचन संपवून भगवान मौन झाले. त्यांनी पद्मासन धारण केले. त्यांचे सूक्ष्म शरीर स्थूल शरीरापासूनही मुक्त झाले. जन्म मृत्यूची श्रंखला त्यांच्यापासून विच्छिन्न झाली. ज्योती केवळ ज्योतीच राहिली प्रकाश देण्यासाठीच. मात्र प्रकाशमान. कार्तिक कृष्णा अमावस्या च्या उषःकाली (चार घडी शिल्लक रात्री) भगवंतांचे महानिर्वाण झाले. त्यावेळी त्यांच्या जवळ सुधर्मा आदी साधू होते. मल्ल आणि लिच्छवी गणांचे अठरा राजे ही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी दीप प्रज्वलित केले. असंख्यात दिव्यांची मालिका पावानगरीत प्रज्वलित झाली. स्वयंप्रकाशी एक आत्मज्योत मात्र उर्ध्वगामी झाली. अनिमिलीत नेत्रांनी प्रभूच्या त्या दिव्य देहाकडे सारे पाहत होते. आजची रात्र अमावस्येची, जणू चंद्र ही प्रभूंच्या दर्शनासाठी निघून गेला होता. भगवंतांच्या निर्वाणाची वार्ता चौफेर पसरली, ते ऐकून सर्व धर्मप्रेमी व्यक्ती व्यथित विव्हळ झाले. निर्वाण परम प्रसन्नतेचा विषय आहे, पण संसारी मनुष्य प्रेमास विसरू शकत नाही. भगवंतांचे प्रमुख शिष्य गौतमस्वामी यांना ही सूचना मिळाली, ते क्षणभर स्तब्ध झाले. भगवंतांशी त्यांचा संबंध अतूट होता. भगवान महावीरांच्या सहवासामुळे गौतम स्वामीस एक प्रकारची प्रबल शक्ती लाभली होती. त्यांना महावीरांबद्दल प्रेम होते, अत्यंत जवळीक होती, जिव्हाळा होता. ते भगवंतांपासून वियोग इच्छित नव्हते. भगवंतांच्या उपस्थितीत ही त्यांचा अनुराग क्षीण झाला नाही. म्हणूनच गौतम स्वामी त्यावेळी केवलज्ञान प्राप्ती करू शकले नाहीत. भगवंतांच्या निर्वाणाची वार्ता ऐकून एक क्षण अनुरागाने जोरदार आक्रमण केले. गौतम स्वतःस विसरले, सर्वच साधारण माणसा प्रमाणे विव्हळ झाले. परंतु हे क्षणिक होते. ते महाज्ञानी होते,श्रुतसागराचे परम तत्त्वदृष्टा होते. गौतमस्वामींना भगवंतांचे तीस वर्ष सानिध्य लाभले. त्यांनी सर्व जिज्ञासू विचारांना विकासात नियोजित केले होते. भगवती सूत्र ग्रंथ रचना आज ही त्याची साक्ष देते. इतका मोठा ज्ञानी पुरुष शोक नाही करू शकत. ते क्षणात सावरले. भगवंतांची वितराग प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर आली. त्यांचा अनुराग क्षीण झाला. आणि गौतम स्वामी स्वतः वितराग झाले. आता ते भगवान महावीरां पासून अभिन्न झाले. हजारो भक्त भगवान महावीरांच्या अंतिम दर्शनासाठी आले. ज्यांनी सधर्मांचा उपदेश देऊन जीव जातीला, अखिल मानवास उपकृत केले ते आज मुक्तीपदास प्राप्त झाले होते. त्यांच्या या उर्ध्वगमनालाच जैन परिभाषेत निर्वाण, महापरीनिर्वाण असे म्हणतात. त्याचा अर्थ आहे आत्म्याची परिपूर्ण विशुद्ध, परमशांत अवस्था. आत्म्याने जन्ममृत्यूवर मिळवलेला कायमचा विजय. निर्वाण म्हणजे अक्षय आणि अजरामर पदाची प्राप्ती. हाच तो मोक्ष. सर्व सामान्य माणसा साठी मृत्यू म्हणजे अत्यंत दुःख दायक घटना. मरण कोणासही अपेक्षित नसते. परंतू साधू संत, महान विभूती साठी मात्र मृत्यू हा जीवनातला अप्रतिम परमानंद उत्सव असतो. साधनेच्या क्रमातील सर्वोच्च स्थिती म्हणजेच कर्म मुक्त अवस्था, हाच निर्वाण अथवा मोक्ष. जन्म मृत्यू च्या शृंखलेस भेदून परम ज्ञाना सह अक्षुण्ण अश्या शांती ची प्राप्ती म्हणजेच निर्वाण. भगवान महावीरा सारख्या परम साधका साठी निर्वाण ही मानव जन्माची सर्वोत्कृष्ट लक्ष्य प्राप्ती आहे. भगवान महावीरांच्या मोक्षाची कल्पना समस्त सृष्टीस आली. समुद्र गर्जू लागला, देव लोकातील मंगल घंटा आपोआप वाजू लागल्या. त्यामुळे लगेच इंद्रदेव आपल्या अनेक सहकारी देवदेवतांसह तेथे उपस्थित झाला. हरिचंदन कापूर आदी उत्कृष्ट सुगंधी वस्तूंची चिता देवाधिकांनी रचली. महावीरांच्या उत्सृष्ट शरीराला नमस्कार करून देवेंद्राने ते चितेवर ठेवले. अग्नि कुमार देवांनी चितेला नमस्कार केला. चिता पेटली. वायु कुमार देवांनी नमस्कार केला. चिता भडकली. सर्व देव मोठमोठ्याने जयजयकार करीत चितेला प्रदक्षिणा घालू लागले. अखेर चितेची राख झाली. सर्वांनीच ती राख मोठ्या भक्तीने आणि उत्साहाने आपल्या मस्तकावर धारण केली. देव देखील त्या रक्षेलाच मोठे ऐश्वर्य समजून मस्तकावर धारण करून मोठ्या आनंदाने जयजयकार करीत स्वर्गात निघून गेले. रक्षेचा एक कण देखील शिल्लक राहिला नाही. आणि त्याच दिवशी रात्री महापंडित इंद्रभूती गौतमस्वामींना देखील केवलज्ञान सर्वज्ञता प्रगट झाले. विश्वज्ञानी भगवान महावीरांना मोक्ष लक्ष्मीची व त्यांच्या प्रथम गणधर इंद्रभूतीला ज्ञान लक्ष्मीची प्राप्ती झाली. जनतेला अपार आनंद झाला. घरोघर दीप ऊजळले गेले. रस्तोरस्ती दीप तेजाळले. सर्वत्र मंगलदीपकांची रांगच रांग प्रकाशू लागली. दीपांच्या माला जागोजागी चमकू लागल्या. ते पाहून लोक नृत्य करू लागले. भक्त गाऊ लागले. ' नमश्री वर्धमानय ' असा जयघोष दाही दिशातून घुमू लागला. या अविस्मरणीय आनंदाला नाव देण्यात आले... दीपावली. त्या दिवसाला नाव मिळालं दिवाळी अर्थात आनंदाची दिवाळी, ज्ञानाची दिवाळी,मोक्ष सुखाची दिवाळी. भगवान महावीरांच्या महानिर्वाणाची दिवाळी. आणि हाच उत्सव धर्मप्रेमी जनता युगानु युगे साजरी करणार आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

श्रीनगरमध्ये भीषण आग; बटमालूमधील दोन घरे आगीत जळून खाक
शरद पवारांच्या राजकीय हालचालींबाबत मोठा खुलासा; प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण!
मुंबईत NSG आणि भारतीय वायुदलाची संयुक्त मॉक ड्रिल; सुरक्षा यंत्रणांकडून आपत्कालीन परिस्थितीचा सराव!
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




